रिचर्डस यांच्या मुलाकडून विराटला पेंटिंग भेट

By Admin | Updated: July 26, 2016 20:29 IST2016-07-26T20:16:12+5:302016-07-26T20:29:44+5:30

टीम इंंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली याच्या चाहत्याच्या यादीत आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. सर विव्हियन रिचर्डस् यांचा मुलगा माली रिचर्डस् याने विराटला स्वत: काढलेले एक पेंटिंग भेट दिले.

Viratla painting visit by Richard's son | रिचर्डस यांच्या मुलाकडून विराटला पेंटिंग भेट

रिचर्डस यांच्या मुलाकडून विराटला पेंटिंग भेट

ऑनलाइन लोकमत

अँटिग्वा, दि. २६  : टीम इंंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली याच्या चाहत्याच्या यादीत आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. सर विव्हियन रिचर्डस् यांचा मुलगा माली रिचर्डस् याने विराटला स्वत: काढलेले एक पेंटिंग भेट दिले.

दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये गणना होत असलेले रिचर्डस् यांचा मुलगा माली हा देखील विराटच्या खेळाचा चाहता आहे. विराटने पहिल्या कसोटीत दुहेरी शतक ठोकले होते. भारताने हा सामना एक डाव ९२ धावांनी जिंकला. माली हा स्वत: क्रिकेटपटू आहे. तो १८ प्रथमश्रेणी सामने खेळला. सध्या तो हाऊस आॅफ क्रिएटिव्हिटी या आर्ट गॅलरीचा मालक असून विराटच्या खेळीमुळे मला आणि
माझ्या मित्रांना प्रेरणा मिळाल्याचे मालीचे मत आहे. त्याने विराटलापेंटिंग भेट दिले.

३२ वर्षांचा माली म्हणाला,विराट पहिल्या कसोटीत अँटिग्वा येथे खेळेल याबद्दल आम्ही फारच उत्सुक होतो. आम्ही विराटसाठी काही रचनात्मक विचार केला होता. आम्ही विराटचे दुहेरी शतक अविस्मरणीय ठरविण्याचा प्रयत्न केला. मी हे पेंटिंग एका दिवसात तयार केले.ह्ण बीसीसीआयने विराटचे हातात पेंटिंग घेतलेले छायाचित्र शेअर केले. या छायाचित्रात विराटसोबत सर
विव्हियन रिचर्डस् आणि त्यांचा मुलगा माली दिसत आहे. भारत- विंडीजदरम्यान दुसरी कसोटी जमैकाच्या सबिना पार्क येथे शनिवारपासून खेळली जाईल.

Web Title: Viratla painting visit by Richard's son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.