विराटची आक्रमकता जपणार, पण... : कुंबळे

By Admin | Updated: July 4, 2016 17:57 IST2016-07-04T17:57:42+5:302016-07-04T17:57:42+5:30

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीची मैदानावरील आक्रमकता नियंत्रित करणारा मी शेवटचा व्यक्ती असेल, असे मत भारतीय संघाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले

Virat will be aggressive, but ...: Kumble | विराटची आक्रमकता जपणार, पण... : कुंबळे

विराटची आक्रमकता जपणार, पण... : कुंबळे

ऑनलाइन लोकमत
बेंगळुरू, दि. ४  : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीची मैदानावरील आक्रमकता नियंत्रित करणारा मी शेवटचा व्यक्ती असेल, असे मत भारतीय संघाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले. पण, भारतीय दूत म्हणून खेळाडूंनी मर्यादेचे उल्लंघन करू नये, असेही ते म्हणाले.

विंडीज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना कुंबळे म्हणाले,मला विराटची आक्रमकता आवडते. मी काही त्यापेक्षा वेगळा नव्हतो. मैदानावर मीसुद्धा आक्रमक होतो. पण, मैदानावरील कामगिरी कशी होते, याला अधिक महत्त्व असते. ह्ण
कुंबळे यांनी कोहलीसह सर्व आक्रमक खेळाडूंना इशारा देताना सांगितले की, भारतीय दूत व भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य असणे किती महत्त्वाचे आहे, याची सर्वांना कल्पना आहे. मर्यादा न ओलांडता आक्रमकता दाखविणे महत्त्वाचे ठरते. मी कुणाच्या स्वभावाला निश्चितच मुरड घालणार नाही.ह्ण

विंडीज दौऱ्यातील आगामी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेबाबत बोलताना भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणाला,ह्यसर्वच खेळाडू विजयासाठीच प्रयत्नशील असतात. प्रशिक्षक म्हणून संघ विजय झालेला बघण्यास उत्सुक असतो. खेळाच्या प्रत्येक विभागावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असते. आगामी सत्रात बरेच कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. त्यामुळे उणिवा असतील तर दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहील. आम्ही १७ कसोटी सामने खेळणार आहोत. विंडीज दौऱ्यापासून याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर मायदेशात न्यूझीलंड, इंग्लंड आणि त्यानंतर आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिका होतील.ह्ण
कुंबळे यांनी पुढे सांगितले की,ह्यकामगिरीत सातत्य राखण्याचे आमचे लक्ष्य आहे. प्रत्येक लढतीत विजयाच्या निर्धारानेच सहभागी होणार आहे. अश्विनच्या हाताला झालेली दुखापत जबर नाही, पण फिजिओची त्याच्यावर नजर आहे.

Web Title: Virat will be aggressive, but ...: Kumble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.