धोनीचा हा रेकॉर्ड तोडणे विराटला अशक्य
By Admin | Updated: February 28, 2017 12:43 IST2017-02-28T12:43:14+5:302017-02-28T12:43:38+5:30
कॅप्टन कूल धोनीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय संघाचे नेतृत्व अपेक्षेप्रमाणे विराट कोहलीकडे सोपवण्यात आले.

धोनीचा हा रेकॉर्ड तोडणे विराटला अशक्य
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - कॅप्टन कूल धोनीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय संघाचे नेतृत्व अपेक्षेप्रमाणे विराट कोहलीकडे सोपवण्यात आले. आक्रमक स्वभावाच्या विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर कोहलीने सातत्याने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याचप्रमाणे आपल्या सहकारी खेळाडूना ही त्याने प्रोत्साहन देत आपला विजयरथ कायम ठेवला.
ऑस्ट्रेलियाविरोधात पुणे कसोटीत विरोटसेनेला 333 धावांनी पराभव स्विकारावा लागला, त्यापुर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 19 कसोटी सामन्यात 17 विजय आणि 2 ड्रॉ राखत अपारिजित राहिला होता. येणाऱ्या काळात विराट भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार होईल पण धोनीच्या कसोटी कर्णधार असातानाच्या विक्रमाची बरोबरी करु शकणार नाही. पुणे कसोटीतील पराभवानंतर विराटच्या हातून तो चान्स गेला आहे.
धोनीने 2008 मध्ये भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सुत्रे आपल्या हाती घेतली, त्यानंतर कर्णधारपद सोडेपर्यंत त्याने भारतीय मैदानावर एकदाही ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजय मिळवून दिला नव्हता. भारतीय मैदानावर ऑस्ट्रेलियाविरोधात धोनी अपराजित आहे. हा आगळा-वेगळा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. 2008-9 आणि 2010-11 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात भारताने 2-0 आणि 2012-13मध्ये 4-0 ने विजय मिळवला होता. धोनीने ऑस्ट्रेलियाविरोधात भारतामध्ये 8 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे.
(भारताच्या या फिरकीपटूमुळे विराटसेनेनं गमावली पुणे कसोटी)
पुण्यात खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटसेनेला 333 धावांच्या माणहाणीकारक पराभवाला सामोरे जावं लागले आहे. ऑस्ट्रेलियचा लेग स्पिनगर स्टीव ओ कीफे ने सामन्यात 12 भारतीय फलंदाजाला बाद करत विजयात मोठा वाटा उचलला. पुणे कसोटीत भारतीय संघ पहिल्या डावात 105 तर दुसऱ्या डावात 107 धावांवर गारद झाला. चार कसोटी सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने 1-0ने आघाडीवर आहे. दुसरा सामना चार मार्च रोजी सुरु होणार.