विराटने केलं ट्वीट, आज करणार मोठा खुलासा

By Admin | Updated: February 19, 2017 13:03 IST2017-02-19T12:40:03+5:302017-02-19T13:03:09+5:30

शनिवारी विराट कोहलीने 'रविवारी मोठा खुलासा करणार आहे' असं ट्वीट केलं

Virat tweet, today's big disclosure | विराटने केलं ट्वीट, आज करणार मोठा खुलासा

विराटने केलं ट्वीट, आज करणार मोठा खुलासा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबतचं कोणतंही वृत्त हल्ली चर्चेचा विषय ठरतं. त्याच्या खेळामुळे तो नेहमीच चर्चेत असतो मात्र त्याने नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमुळे तो पुन्हा  चर्चेचा विषय बनला आहे.  शनिवारी विराटने 'रविवारी मोठा खुलासा करणार आहे' असं ट्वीट केलं आहे. 
 
या ट्वीटसोबत विराटने एक व्हिडीओही शेअर केला आहे. ''कोणत्यातरी मोठ्या गोष्टीची सुरूवात होणार आहे'' असं विराट या व्हिडीओत म्हणतो.  विराटच्या या ट्वीटनंतर विविध तर्क काढले जात आहेत. यानंतर विराट अनुष्कासोबत साखरपूडा करण्याची घोषणा करणार असल्याचीही चर्चा आहे, तर एखाद्या नव्या जाहिरातीच्या प्रमोशनबाबतही तो खुलासा करू शकतो असं बोललं जात आहे. नक्की कशाबद्दल विराट खुलासा करणार आहे ते मात्र तोच सांगेल.

Web Title: Virat tweet, today's big disclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.