विराटचा ‘मास्टर’ स्ट्रोक !

By Admin | Updated: December 24, 2014 09:21 IST2014-12-24T01:48:29+5:302014-12-24T09:21:52+5:30

विराटचे ४८ लाख ७० हजार १९० फॉलोअर्स असून, सचिनच्या फॉलोअर्सची संख्या ४८ लाख ६९ हजार ८४९ इतकी आहे.

Virat 'Master' stroke! | विराटचा ‘मास्टर’ स्ट्रोक !

विराटचा ‘मास्टर’ स्ट्रोक !

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार विराट कोहली याने मैदानासह बाहेरही ‘मास्टर’ स्ट्रोक लगावला आहे. क्रीडापटूंमध्ये टिष्ट्वटरवर सर्वांत जास्त फॉलोअर्स असलेल्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला पिछाडीवर टाकले आहे. विराटचे ४८ लाख ७० हजार १९० फॉलोअर्स असून, सचिनच्या फॉलोअर्सची संख्या ४८ लाख ६९ हजार ८४९ इतकी आहे.
आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या विराट कोहलीची बॅट पहिल्याच लढतीत चांगलीच तळपली होती आणि त्यात अनुष्का शर्मासह त्याचे असलेले प्रेमसंबंध हे जास्त चर्चेचे विषय होते. त्यामुळे विराटच्या फॉलोअर्समध्ये दिवसेंदिवस वाढ होत गेली. विराट व सचिनपाठोपाठ भारतीय संघाचा कर्णधार
महेंद्रसिंग धोनी ३३ लाख २७ हजार ०३३ फॉलोअर्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, सुरेश रैना यांचा क्रमांक येतो.
अव्वल १० खेळाडूंमध्ये ९ खेळाडू क्रिकेटपटू असले तरी टेनिस स्टार सानिया मिर्झाने यात एन्ट्री घेत सर्वांना चकित केले आहे. ती ७व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर झहीर खान, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांचा नंबर येतो. (वृत्तसंस्था)

Web Title: Virat 'Master' stroke!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.