कोहलीच्या 'विराट' फलंदाजीने लंकेला व्हाईटवॉश
By Admin | Updated: November 16, 2014 21:44 IST2014-11-16T21:30:41+5:302014-11-16T21:44:16+5:30
विराट कोहलीने जोरदार फटकेबाजी करत लंकेच्या गोलंदाजांच्या नाकी दम आणला. १२६ चेंडूत १२ चौकार व तीन षटकार लगावत कोहलीने १३९ धावा करत आपल्या विराट खेळाचे प्रदर्शन केले.

कोहलीच्या 'विराट' फलंदाजीने लंकेला व्हाईटवॉश
>ऑनलाइन लोकमत
रांची, दि. १७ - विराट कोहलीने जोरदार फटकेबाजी करत लंकेच्या गोलंदाजांच्या नाकी दम आणला. १२६ चेंडूत १२ चौकार व तीन षटकार लगावत कोहलीने १३९ धावा करत आपल्या विराट खेळाचे प्रदर्शन केले. कोहली व अंबाटी रायडू वगळता एकाही भारतीय फलंदाजाने उल्लेखनीय कामगिरी केली नाही. अजंथा मेंडिस या लंकेच्या फिरकी गोलंदाजाने भारताच्या खेळाडूंना तंबूत पाठवण्यात सिंहाचा वाटा उचलला. अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा,केदार जाधव आणि आर. अश्वीन हे चारही खेळाडू मेंडिसने बाद केले. तर, मेंडिसच्याच गोलंदाजीवर चांदिमलने त्रिफळाचित केल्याने स्टुअर्ट बिन्नी बाद झाला. तसेच रॉबीन उथप्पा पायचीत झाला. तब्बल सहा विकेट घेणा-या मेंडिसमुळे भारताच्या हातून सामना जातोय की काय, अशी परिस्थिती उद्भवली असताना विराटने दमदार फलंदाजी करत सामना सहज खिशात घातला.