विराट कोहलीचा हा व्हिडीओ तरूणांसाठी प्रेरणादायी

By Admin | Updated: September 19, 2016 13:47 IST2016-09-19T12:53:39+5:302016-09-19T13:47:50+5:30

सध्याच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक विराट कोहलीचा समावेश आता सर्वश्रेष्ठ अॅथलीट्समध्येही होत आहे. कोहलीच्या फिटनेसची सध्या सर्वत्र चर्चा आहे

Virat Kohli's video is inspirational for young people | विराट कोहलीचा हा व्हिडीओ तरूणांसाठी प्रेरणादायी

विराट कोहलीचा हा व्हिडीओ तरूणांसाठी प्रेरणादायी

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली,दि.19- सध्याच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक विराट कोहलीचा समावेश आता सर्वश्रेष्ठ अॅथलीट्समध्येही होत आहे. कोहलीच्या  फिटनेसची सध्या सर्वत्र चर्चा आहे मात्र,हे त्याने एका दिवसात साध्य केलेलं नाही. त्याच्या फिटनेसमागे अत्यंत कठीण आणि नियमित ट्रेनिंग आहे. त्याची फिटनेस सध्या जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंनाही टक्कर देते. म्हणून तर विराट सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाचा सगळ्यात फिट खेळाडू आहे.

 

आणखी वाचा-
ख्रिस गेल - विराट कोहलीचा धम्माल डान्स
 
नुकताच कोहलीने आपला एक ट्रेनिंग करतानाचा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवर शेअर केला . या व्हिडीओमध्ये कोहलीने आपल्या चाहत्यांना मॉर्निंग कार्डिओ सेशनची एक झलक दाखवली आहे. कोहलीचा हा व्हिडीओ तरूणांसाठी खरंच प्रेरणादायी आहे. मैदानावर जितकी स्फुर्ती विराट दाखवतो त्यामागे त्याची कठोर मेहनत आहे. 
 
पाहा व्हिडीओ-

Web Title: Virat Kohli's video is inspirational for young people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.