शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

विराटमुळेच निवृत्तीचा विचार बदलला : युवराज सिंग

By admin | Published: January 21, 2017 4:46 AM

कर्करोगाशी झुंज देत असताना एकवेळ क्रिकेट सोडण्याचा विचार डोक्यात आला होता

कटक : ‘कर्करोगाशी झुंज देत असताना एकवेळ क्रिकेट सोडण्याचा विचार डोक्यात आला होता, पण कर्णधार विराट कोहलीने माझ्यात विश्वास जागवला. त्याने निवृत्त न होण्याचा सल्ला दिला. विराटचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मला झंझावाती फलंदाजीची झलक दाखविणे गरजेचे होते.’ ‘षटकारकिंग’ युवराजसिंग याची ही आपबिती आहे.इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेत करियरमधील सर्वोत्कृष्ट १५० धावा ठोकल्यानंतर युवराज म्हणाला, ‘संघ आणि कर्णधार तुमच्या पाठीशी असतील तर आत्मविश्वास संचारणारच! विराटने दाखविलेला विश्वास माझ्यासाठी मोलाचा ठरला. ड्रेसिंग रुम माझ्या पाठीशी असल्यामुळेच मी इतक्या धावा करू शकलो. एकवेळ अशी होती की खेळावे की खेळू नये, असे वाटायचे. अनेकांनी मला मदत केली. कधीही हार न मानण्याची माझी वृत्ती आहे. मेहनत करीत राहावे, परिस्थिती बदलेल, असा विश्वास होताच.’याआधी युवीने अखेरचे शतक २०११च्या विश्वचषकात चेन्नईत ठोकले होते. सहा वर्षांनंतर कर्करोगावर विजय मिळवित मी खेळात परतलो आहे. आधीची दोन-तीन वर्षे कठीण गेली. फिटनेसवर मेहनत घेत राहिल्याने संघात आत-बाहेर होत होतो. यंदा रणजी करंडकात शानदार कामगिरी झाली. आॅक्टोबरमध्ये बडोदा संघाविरुद्ध २६० धावा ठोकल्या. त्याचा लाभ झाल्याचे युवीचे मत आहे.युवराजला संघात स्थान देण्याबाबत वेगवेगळी मते होती. काहींनी भारतीय संघ मागे जात असल्याची प्रतिक्रिया दिली पण युवीवर याचा परिणाम झाला नाही. मी वृत्तपत्र वाचत नाही अन् टीव्हीदेखील पाहात नसल्याने कोण काय म्हणतो, याची काळजी करीत नाही. माझ्यात क्रिकेट शिल्लक आहे हेच मला दाखवायचे होते. १५० धावा ठोकल्याचा आनंद आहे. ही लय कायम राखायची आहे, असे युवराजने सांगितले. इंग्लंड संघ धोकादायक असल्याचे नमूद करीत युवी पुढे म्हणाला, ‘सध्याचा इंग्लंड संघ चांगला खेळत असून, मधली फळी फारच धोकादायक असल्याने आमच्या गोलंदाजांचे मनोबल ढासळण्याइतपत त्यांच्याकडे भक्कम फलंदाजी आहे.’ (वृत्तसंस्था)>धोनीसारख्या अनुभवी खेळाडूची साथ कुणाला नको आहे, असे सांगून युवी म्हणाला, ‘करियर सुरू केल्यापासून मी माहीसोबत खेळत आलो आहे. आमच्यात फार चांगला समन्वय आहे. भविष्यातदेखील कायम राहील.>अमिताभ म्हणाले, ‘व्वा चॅम्पियन’!युवराजसिंगच्या दुसऱ्या वन डेतील १५० धावांच्या खेळीवर महान अभिनेते अमिताभ बच्चन जाम खूश आहेत. टिष्ट्वटरवर युवीचे अभिनंदन करीत त्यांनी लिहिले, ‘व्वा चॅम्पियन!, भारताने इंग्लंडला हरविले. युवी तू चॅम्पियनसारखा खेळलास.’ सुपरस्टार शहारुख खान यांनी देखील युवराज आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या खेळाचे कौतुक केले. शहारुखने लिहिले, ‘युवी आणि धोनी यांच्याकडून अशी फलंदाजी होताना पाहणे फार आनंददायी असते. खरेच शेरों का जमाना होता हैं !’