विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार
By Admin | Updated: October 22, 2014 04:53 IST2014-10-22T04:53:29+5:302014-10-22T04:53:29+5:30
: टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील सुरुवातीच्या तीन वन-डे सामन्यांतून विश्रांती देण्यात आली आहे़

विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार
नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील सुरुवातीच्या तीन वन-डे सामन्यांतून विश्रांती देण्यात आली आहे़ त्याच्या अनुपस्थितीत विराट कोहलीकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे़ सराव सामन्यासाठी भारतीय ‘अ’ संघही घोषित करण्यात आला आहे़
भारतीय क्रिकेट नियामक
मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी लंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे़ वेस्ट इंडीजने भारत दौऱ्यातील वन-डे मालिका मध्येच सोडून दिल्यामुळे भारताने श्रीलंकेला भारत दौऱ्यावर बोलविले आहे़
वेस्ट इंडीजविरुद्धच्या सिरीजमध्ये संघातून बाहेर ठेवण्यात आलेल्या
आऱ आश्विनला टीममध्ये जागा मिळाली आहे, तर अमित मिश्रा
आणि अक्षर पटेल या फिरकी गोलंदाजांचाही संघात समावेश करण्यात आला आहे़
१९ वर्षीय चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला सिनिअर संघात जागा मिळू शकली नाही़ मात्र, त्याला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यासाठी भारतीय ‘अ’ संघात संधी देण्यात आली आहे़ दुखापतीतून सावरत असलेला अनुभवी फलंदाज रोहित शर्मा यालासुद्धा पहिल्या तीन वन-डेत स्थान देण्यात आले आहे़
विराट कोहलीकडे तिसऱ्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे़ यापूर्वी २०१३ मध्ये धोनीला दुखापत झाल्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्ध कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळाली होती, तर मार्चमध्ये झिम्बाब्वे आणि आशिया चषकातही विराट टीम इंडियाचा कर्णधार होता़ (वृत्तसंस्था)०