विराटने फलंदाजीला चौथ्या क्रमांकावर यावे
By Admin | Updated: January 25, 2015 01:58 IST2015-01-25T01:58:47+5:302015-01-25T01:58:47+5:30
न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर चौथ्या क्रमांकावरच फलंदाजी करावी, असा सल्ला वेस्ट इंडीजचा महान माजी फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स याने दिला आहे़

विराटने फलंदाजीला चौथ्या क्रमांकावर यावे
नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर चौथ्या क्रमांकावरच फलंदाजी करावी, असा सल्ला वेस्ट इंडीजचा महान माजी फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स याने दिला आहे़
आॅस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अनुक्रमे ९ अणि ४ धावा बनविल्या आहेत़ यानंतर कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी किंवा नाही, यावर सध्या खल सुरू आहे़
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने हा निर्णय योग्य ठरविला आहे़ चौथ्या क्रमांकावर विराट फलंदाजीला आल्यास त्याला डाव सांभाळण्याची संधी मिळेल़ कोणत्याही परिस्थितीत त्याच्यात उत्कृ ष्ट खेळ करण्याची क्षमता आहे़ त्यामुळे त्याने कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी केली तरी त्याच्या खेळावर परिणाम होत नाही़
रिचडर््सने सांगितले, की चौथ्या क्रमांकावर कोहली फलंदाजीला आला तर परिस्थितीनुसार कसा खेळ करायचा, याचा त्याला अंदाज येईल़ हा फलंदाज परिस्थितीनुसार फलंदाजी करण्यास सक्षम आहे़ संघाच्या विकेट पडल्या असतील, तर तो संघाला अडचणीतून बाहेर काढतो, तसेच जर संघ मजबूत स्थितीत असेल तर हा खेळाडू आक्रमक खेळसुद्धा करू शकतो़ त्यामुळे त्याने चौथ्या क्रमांकावरच फलंदाजी करणे योग्य ठरेल़ (वृत्तसंस्था)
‘‘आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सलामीला किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे खूप कठीण काम आहे़ त्यामुळे कोहलीने आगामी वर्ल्डकप लक्षात घेता, चौथ्या क्रमांकावरच फलंदाजी करावी़ याचा भारताला लाभच होईल, यात शंका नाही़’’