विराट कोहली दुस-या क्रमांकावर

By Admin | Updated: October 21, 2014 02:48 IST2014-10-21T02:48:56+5:302014-10-21T02:48:56+5:30

ताज्या फलंदाज रँकिंगमध्ये विराट कोहली दुस-या क्रमांकावर पोहोचला आहे़ गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने अव्वल १० खेळाडूंत स्थान मिळविले आहे़

Virat Kohli second position | विराट कोहली दुस-या क्रमांकावर

विराट कोहली दुस-या क्रमांकावर

दुबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन-डे मालिकेत फॉर्ममध्ये परतल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या फलंदाज रँकिंगमध्ये विराट कोहली दुस-या क्रमांकावर पोहोचला आहे़ गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने अव्वल १० खेळाडूंत स्थान मिळविले आहे़
स्टार फलंदाज कोहलीने विंडीज विरुद्धच्या वन-डे मालिकेत एका शतकासह १९१ धावा बनविल्या होत्या़ या कामगिरीमुळे फलंदाजी क्रमवारीत भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी सहाव्या क्रमांकावर कायम आहे,तर शिखर धवन एका क्रमांकाच्या तोट्यासह आठव्या स्थानावर पोहोचला आहे़ सुरेश रैना ३ स्थानांच्या लाभासह १५व्या क्रमांकावर पोहोचला आहे़
गोलंदाजी क्रमवारीत भुवनेश्वर कुमारने विंडीजविरुद्धच्या मालिकेत केवळ २ बळी मिळविले; तरीही तो ताज्या क्रमवारीत सात क्रमांकांच्या लाभासह साव्या स्थानावर पोहोचला आहे़ रवींद्र जडेजा ५ वरून सहाव्या क्रमांकावर गेला आहे. मालिकेत १० गडी बाद करणारा वेगवान गोलंदाज मोहंमद शमीला ५ स्थानांचा लाभ झाला आहे़ (वृत्तसंस्था)

Web Title: Virat Kohli second position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.