हरभजन म्हणतो विराट चॅम्पियन, पण...

By Admin | Updated: February 21, 2017 17:12 IST2017-02-21T17:02:50+5:302017-02-21T17:12:52+5:30

हरभजन सिंग म्हणतो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा चॅम्पीयन प्लेयर आहे, मात्र...

Virat Kohli says Virat Kohli | हरभजन म्हणतो विराट चॅम्पियन, पण...

हरभजन म्हणतो विराट चॅम्पियन, पण...

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 21 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा चॅम्पीयन प्लेयर आहे अशा शब्दांत दिग्गज ऑफस्पिनर हरभजन सिंगने कोहलीचं कौतूक केलं. पुण्यात आयोजित लिटरेचर फेस्टिवल 'स्‍पोर्टेल'मध्ये भज्जी बोलत होता. सध्याचा विराटचा फॉर्म अप्रतिम आहे, विराट फलंदाजीमधील सर्व विक्रम मोडेल असा विश्वासही हरभजनने व्यक्त केला.
 
विराट कोहलीच्या भन्नाट फॉर्ममुळे क्रिकेटचा दिग्गज सचिन तेंडुलकरसोबत विराटची तुलना व्हायला लागली आहे, असाच एक प्रश्न भज्जीला विचारण्यात आला.एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यातील सर्वोत्कृष्ट कोण? असा गुगली भज्जीला टाकण्यात आला. त्यावर कोहली हा चॅम्पियन प्लेयर आहे असं तो म्हणाला मात्र, सचिनच नेहमी नंबर वन राहील हे सांगायला तो विसरला नाही. 
 
विराट फलंदाजीमधील सर्व विक्रम मोडेल अशी अपेक्षा त्याने यावेळी व्यक्त केली पण सचिन सचिनच राहील असं तो म्हणाला. विराट आणि माझ्यासह देशातील बहुतांश जणांनी सचिनला पाहूनच खेळण्यास सुरूवात केली. तुम्ही विराटला विचारलं तर तोही हेच म्हणेल असं भज्जी म्हणाला.   
 

Web Title: Virat Kohli says Virat Kohli