दुखापतग्रस्त कोहलीची पंजाबविरुद्ध खेळण्याची तयारी
By Admin | Updated: May 18, 2016 06:04 IST2016-05-18T06:04:49+5:302016-05-18T06:04:49+5:30
सर्वोत्तम फॉर्मात असून हाताच्या दुखापतीचे दु:ख विसरुन बुधवारी इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत खेळण्याची त्याची तयारी

दुखापतग्रस्त कोहलीची पंजाबविरुद्ध खेळण्याची तयारी
बेंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्मात असून हाताच्या दुखापतीचे दु:ख विसरुन बुधवारी इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत खेळण्याची त्याची तयारी आहे.
कोहलीच्या हाताला सोमवारी कोलकाता नाईटरायडर्सविरुद्धच्या लढतीत क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. झेल टिपण्यासाठी त्याने सूर मारला असताना त्याच्या हाताला दुखापत झाली. उपचारासाठी त्याला काही वेळ मैदानाबाहेर जावे लागले. त्यानंतर बेंगळुरु संघाची प्ले आॅफची आशा कायम राखण्यासाठी त्याने चमकदार खेळी केली. आरसीबी संघाचे व्यवस्थापक अविनाश वैद्य यांनी स्पष्ट केले की, भारताचा अव्वल फलंदाज बुधवारच्या लढतीत खेळणार आहे.
पंजाबचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने स्नायूच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वाची वाटचाल अखेरच्या टप्प्याकडे सुरू असताना आरसीबी संघाची फलंदाजी प्रतिस्पर्धी संघांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. कोहलीने ‘आॅरेंज कॅप’च्या शर्यतीत प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत मोठी आघाडी घेतली आहे.त्याने आतापर्यंत १२ सामन्यांत ७५२ धावा फटकावल्या असून यंदाच्या मोसमात तीन शतके झळकावली आहेत. त्याने एका मोमसात सर्वाधिक धावा फटकावण्याचा ख्रिस गेलचा (७३३ धावा) विक्रम मोडला आहे. गेलने सूर गवसल्याचे संकेत देताना ४९ धावांची खेळी केली आहे. मुरली विजयच्या नेतृत्वाखालील किंग्स इलेव्हन पंजाब संघासाठी हा चिंतेचा विषय आहे. कोहलीला डिव्हिलियर्सची योग्य साथ लाभली आहे.(वृत्तसंस्था)
>प्रतिस्पर्धी संघ
रॉयल चॅलेंजर्स : विराट कोहली (कर्णधार), ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, शेन वॉटसन, के.एल. राहुल, सचिन बेबी, वरुण अॅरोन, अबु नेचिम, श्रीनाथ अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, युजवेंद्र चाहल, ट्रेव्हिस हेड, इक्बाल अब्दुल्ला, केदार जाधव, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड विसे, अक्षय कर्णेवार, सरफराज खान, विक्रमजीत मलिक, मंदीप सिंग, परवेज रसूल, हर्षल पटेल, केन रिचर्डसन, तबरेज शम्सी, विकास टोकस, प्रवीण दुबे.
किंग्स इलेवन पंजाब : मुरली विजय (कर्णधार), हाशिम अमला, डेव्हिड मिलर, रिद्धिमान साहा, गुरकीरत मान, अक्षर पटेल, मार्कस स्टोइनिस, संदीप शर्मा, मोहित शर्मा, अनुरीत सिंग, मनन व्होराा, शार्दुल ठाकूर, निखिल नायक, मिशेल जॉन्सन, केसी करियप्पा, फरहान बेहारडियन, अरमान जाफर, केली एबोट, प्रदीप साहू, स्वप्नील सिंग.