शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
4
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
5
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
6
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
7
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
8
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
9
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
10
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
11
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
12
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
13
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
14
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
15
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
16
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
17
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
18
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी
19
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
20
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...

कोहली, पुजाराच्या सेंच्युरीमुळे भारत सुस्थितीत, 2 बाद 235

By admin | Updated: November 17, 2016 15:16 IST

भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर अडचणीत सापडलेला भारताचा डाव कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पूजारा या दोघांनी सावरला.

 ऑनलाइन लोकमत 

विशाखापट्टणम, दि. 17 - भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर अडचणीत सापडलेला भारताचा डाव कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनी सावरला. विराट कोहली (१०४) आणि चेतेश्वर पुजारा (१०९) यांच्या नाबाद शतकी खेळीमुळे इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत भारत सुस्थितीत असून ६४.४ षटकांत भारताने २ गडी गमावून २३५ धावा केल्या आहेत.
पुजारा आणि कोहली दोघांनी १३० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करत भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. २२ धावांत भारताचे दोन गडी बाद झाल्यानंतर भारताचा डाव अडचणीत आला होता. पण कोहली आणि पुजाराने इंग्लंडच्या गोलंदाजीचा संयमाने सामना करत भारताच्या डावाला आकार दिला. 
 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताला लोकेश राहुलच्या रुपाने पहिला धक्का बसला. लोकेश राहुलला भोपळाही फोडू न (०)  देता ब्रॉडने स्टोक्सकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ मुरली विजयही (२०) अँडरसनच्या उसळत्या चेंडूवर स्टोक्सकडे झेल देत बाद झाल्याने भारताला दुसरा धक्का बसला आणि भारताची स्थिती २ बाद २२ अशी बिकट झाली होती. 
 
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात एकमेव बदल करण्यात आला आहे. सलामीवीर गौतम गंभीरच्या जागी लोकेश राहुलचा संघात समावेश करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहलीने तसे संकेत याआधीच दिले होते. गंभीरला मिळालेल्या संधीमध्ये अपेक्षित छाप उमटवता आली नाही. राजकोटची पहिली कसोटी अनिर्णीत राहिली असली तरी, भारतीय संघ बॅकफूटवर ढकलला गेला होता. 
 
चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजयचा अपवाद वगळता अन्य फलंदाज आणि गोलंदाज अपयशी ठरले होते. त्यामुळे बांगलादेशातून निराशाजनक कामगिरी करुन आलेल्या इंग्लंड संघाचे मनोधैर्य उंचावले.