कोहलीने केला कसून सराव; हेअरस्टाइलमुळे केंद्रबिंदू
By Admin | Updated: February 21, 2015 02:32 IST2015-02-21T02:32:29+5:302015-02-21T02:32:29+5:30
विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी फिरकी गोलंदाजीवर फलंदाजीचा कसून सराव केला

कोहलीने केला कसून सराव; हेअरस्टाइलमुळे केंद्रबिंदू
मेलबर्न : आपल्या नेत्रदीपक फटकेबाजीबरोबरच ‘मोहॉक’ हेअरस्टाईलमुळे आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेल्या विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी फिरकी गोलंदाजीवर फलंदाजीचा कसून सराव केला.सेंट किल्डाच्या जंक्शन ओव्हल मैदानावर कोहलीने शुक्रवारी फिरकी गोलंदाजांची धुलाई केली. राखीव फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि अनियमित आॅफस्पिनर सुरेश रैनाने आज जास्त गोलंदाजी केली. भारतीय संघाने आज दोन गटांत सराव केला.