विराट आयसीसीचा वनडे कर्णधार
By Admin | Updated: December 22, 2016 21:04 IST2016-12-22T21:04:19+5:302016-12-22T21:04:19+5:30
धडाकेबाज फलंदाजीने आणि कुशल कप्तानीने यंदाचे वर्ष गाजवणारा भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची आयसीसीच्या एकदिवसीय कर्णधारपदी निवड

विराट आयसीसीचा वनडे कर्णधार
>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 22 - धडाकेबाज फलंदाजीने आणि कुशल कप्तानीने यंदाचे वर्ष गाजवणारा भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची आयसीसीच्या एकदिवसीय कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. या संघात विराटसोबतच रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या दोन भारतीय क्रिकेटपटूंनाही स्थान मिळाले आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये या वर्षभरात एक हजारहून अधिक धावा आणि तीन द्विशतके फटकावणाऱ्या विराटला आयसीसीच्या कसोटी संघात स्थान मिळाले नाही. भारताच्या केवळ रविचंद्रन अश्विनलाच कसोची संघात स्थान मिळाले आहे. आयसीसीचे यंदाच्या वर्षातील एकदिवसीय आणि कसोटी संघ पुढीलप्रमाणे आहेत.
आयसीसीचा एकदिवसीय संघ (2016) : विराट कोहली ( कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, क्विंटन डि कॉक, रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स, जोस बटलर, मिशेल स्टार्क, कागिसो रबाडा, सुनील नारायण, इम्रान ताहीर.
आयसीसीचा कसोटी संघ (2016) : अॅलेस्टर कूक (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, केन विल्यम्सन, जो रूट, अॅडम व्होग्स, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, आर. अश्विन, रंगना हेराथ, मिचेल स्टार्क, डेल स्टेन आणि स्टीव्हन स्मिथ.