शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

अजिंक्यच्या खेळीने विराट धावसंख्या

By admin | Updated: December 6, 2015 23:37 IST

भारताने दिलेल्या ४८१ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने ‘कछुआ छाप’ फलंदाजी करताना चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसअखेर ७२ षटकांत २ बाद ७२ धावांची मजल मारली.

नवी दिल्ली : अजिंक्य रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावांत शतकी खेळी करण्याचा पराक्रम केल्यानंतर, भारताने दिलेल्या ४८१ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने ‘कछुआ छाप’ फलंदाजी करताना चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसअखेर ७२ षटकांत २ बाद ७२ धावांची मजल मारली. रहाणेच्या(१००) नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारताने दुसरा डाव ५ बाद २६७ धावसंख्येवर घोषित केला. रहाणेने २०६ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार व ३ षटकार ठोकले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ सामना अनिर्णीत राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरला. कर्णधार हाशीम अमलाने संयमी फलंदाजी करताना २०७ चेंडूंना सामोरे जात ३ चौकारांच्या मदतीने नाबाद २३ धावा केल्या. अमलाने सलामीवीर तेंबा बावूमाच्या (३४) साथीने दुसऱ्या विकेटसाठी ३८.४ षटकांत केवळ ४४ धावांची भागीदारी केली. तर त्यानंतर ए.बी. डिव्हिलियर्स (नाबाद ११ धावा, ९१ चेंडू) तिसऱ्या विकेटसाठी २९.२ षटकांत २३ धावांच्या अभेद्य भागीदारी केली. यावरुन दक्षिण आफ्रिका संघाच्या कूर्मगती फलंदाजीची कल्पना येते. दिवसाच्या अखेरच्या दोन सत्रामध्ये दक्षिण आफ्रिका संघाने ३४ व ३३ षटकांमध्ये अनुक्रमे ३५ व २८ धावा फटकावल्या. पाहुण्या संघाची धावसंख्या ५० षटकानंतर २ बाद ४९ अशी होती. २००२ नंतर एखाद्या संघाने ५० षटकांत फटकावलेल्या धावसंख्येचा निचांक ठरला. यापूर्वीचा विक्रम दक्षिण आफ्रिका संघाच्याच नावावर आहे. त्यांनी २००५ मध्ये विंडीजविरुद्ध ६८ धावा फटकावल्या होत्या. पाहुण्या संघाची दुसऱ्या डावात बराच वेळ धावगती १ धाव प्रति षटकापेक्षा कमी होती. अमलाने खाते उघडण्यासाठी ४६ चेंडू खेळले. खाते उघडण्यासाठी सर्वाधिक चेंडू खेळण्याच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी २०१३ मध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने न्यूझीलंडविरुद्ध ६२ तर २००० मध्ये झिम्बाब्वेच्या ग्रॅन्ट फ्लावरने न्यूझीलंडविरुद्ध ५१ चेंडू खेळल्यानंतर खाते उघडले होते. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर डीन एल्गरला (४) रविचंद्रन अश्विनने आपल्या दुसऱ्या व डावातील चौथ्या षटकात माघारी परतवले. त्याचा झेल स्लिपमध्ये तैनात रहाणेने टिपला. त्यानंतर अमला व बावूमा यांनी संथ फलंदाजी केली. चहापानानंतर बावूमाची एकाग्रता भंग झाली. अश्विनच्या सरळ येणाऱ्या चेंडूवर त्याचा अंदाज चुकला व तो बोल्ड झाला. बावूमाने ११७ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार व १ षटकार ठोकला. वन-डे क्रिकेटमध्ये केवळ ३१ चेंडूंमध्ये शतकाला गवसणी घालणाऱ्या डिव्हिलियर्सने ३३ व्या चेंडूवर रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर खाते उघडले. भारतातर्फे जडेजाने २३ षटकांत केवळ १० धावा दिल्या. अश्विनने २३ षटकांमध्ये २९ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. त्याआधी, पहिल्या डावात १२७ धावांची खेळी करणाऱ्या रहाणेने पुन्हा एकदा शानदार शतक झळकावले. कसोटी क्रिकेटमध्ये सहावे शतक झळकावणाऱ्या रहाणेने दोन्ही डावात शतक झळकावणाऱ्या एलिट क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान मिळवले. रहाणेपूर्वी चार भारतीय फलंदाजांनी असा पराक्रम केला आहे. त्यात दिवंगत विजय हजारे (एकवेळा), सुनील गावस्कर (तीनवेळा), राहुल द्रविड (दोनवेळा) आणि विराट कोहली (एकवेळा) यांचा समावेश आहे. शनिवारी संयमी फलंदाजी करणाऱ्या रहाणेने आज नैसर्गिक फलंदाजी केली. एबोटच्या गोलंदाजीवर कटचा चौकार वसूल करणाऱ्या रहाणेने त्यानंतर मोर्न मोर्कच्या गोलंदाजीवर थर्ड मॅनला षटकार ठोकला. रहाणेने त्यानंतर इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर स्लॉग स्वीपच्या फटक्याच्या साह्णाने दुसरा षटकार ठोकला. डेन पिएटच्या गोलंदाजीवर तिसरा षटकार वसूल केला. रहाणेने काल १५२ चेंडूंमध्ये ५२ धावा फटकावल्या होत्या, तर आज ५४ चेंडूंमध्ये ४८ धावा फटकावत शतकाला गवसणी घातली. रहाणेने रिद्धिमान साहाच्या (नाबाद २३) साथीने केवळ १४.१ षटकांत ५६ धावांची भागीदारी केली. त्याआधी, सकाळच्या सत्रात कर्णधार विराट कोहली(८८)कारकीर्दीतील १२ व्या कसोटी शतकापासून वंचित राहिला. कोहलीला कालच्या धावसंख्येत केवळ ५ धावांची भर घालता आली. त्याला एबोटने पायचित केले. कोहलीने रहाणेसोबत पाचव्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी केली. कोहलीने १६५ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार ठोकले. (वृत्तसंस्था)अमला ठरला ‘मिस्टर स्लो’दडपणाखाली अनोखे विक्रम नोंदवले जातात. असे विक्रम नोंदविण्याची किंवा त्याचे स्मरण करण्याची कुणाची इच्छा नसते. अशाच एका विक्रमाची भारताविरुद्ध चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हाशीम अमलाच्या नावावर नोंद झाली. अमलाने रविवारी ११३ चेंडू खेळताना केवळ ६ धावा फटकावल्या होत्या. १० पेक्षा कमी धावा फटकावण्यासाठी त्याने सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम नोंदवला. यापूर्वीचा विक्रम आॅस्ट्रेलियाच्या कार्ल रॅकमनच्या (१०२ चेंडू, ९ धावा) नावावर होता. अजिंक्य रहाणेचा विक्रम >कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावात शतके झळकावण्याचा पराक्रम करणारा अजिंक्य रहाणे भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे. रहाणेने चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात १२७ धावांची तर दुसऱ्या डावात नाबाद १०० धावांची खेळी केली. >यापूर्वी भारतातर्फे अशी कामगिरी विजय हजारे, सुनील गावस्कर, राहुल द्रविड व कसोटी कर्णधार विराट कोहली यांनी केली आहे. रहाणेने आतापर्यंत २१ कसोटी सामन्यांत चार शतके झळकावली होती. २२ व्या कसोटी सामन्यात त्याच्या शतकांची संख्या सहा झाली आहे. मुरली विजयला दंड दुबई : दिल्लीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात बाद दिल्यानंतर पंचाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणारा भारताचा सलामीवीर मुरली विजयला दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या सामना शुल्कातील ३० टक्के रक्कमेची दंड म्हणून कपात करण्यात येणार आहे. मुरली विजयने २.१.५ नियमाचे उल्लंघन केले. धावफलकभारत पहिला डाव ३३४. दक्षिण आफ्रिका पहिला डाव १२१. भारत दुसरा डाव :- मुरली विजय झे. विलास गो. मोर्कल ०३, शिखर धवन त्रि. गो. मोर्कल २१, रोहित शर्मा त्रि. गो. मोर्कल ००, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. ताहीर २८, विराट कोहली पायचित गो. एबोट ८८, अजिंक्य रहाणे नाबाद १००, रिद्धिमान साहा नाबाद २३. अवांतर (४). एकूण १००.१ षटकांत ५ बाद २६७ (डाव घोषित). बाद क्रम : १-४, २-८, ३-५३, ४-५७, ५-२११. गोलंदाजी : मोर्कल २१-६-५१-३, एबोट २२-९-४७-१, पीएट १८-१-५३-०, ताहीर २६.१-४-७४-१, एल्गर १३-१-४०-०. दक्षिण आफ्रिका दुसरा डाव :- डीन एल्गर झे. रहाणे गो. अश्विन ०४, टेम्बा बावूमा त्रि.गो. अश्विन ३४, हाशीम अमला खेळत आहे २३, ए.बी. डिव्हिलियर्स खेळत आहे ११. अवांतर (००). एकूण ७२ षटकांत २ बाद ७२. बाद क्रम : १-५, २-४९. गोलंदाजी : ईशांत १२-७-१६-०, अश्विन २३-१३-२९-२, जडेजा २३-१६-१०-०, यादव ९-६-६-०, धवन ३-१-९-०, विजय २-०-२-०.