भारताच्या या फिरकीपटूमुळे विराटसेनेनं गमावली पुणे कसोटी

By Admin | Updated: February 26, 2017 17:24 IST2017-02-26T17:24:18+5:302017-02-26T17:24:18+5:30

ऑस्ट्रेलियनं संघाने भारताला पराभूत करण्यासाठी गेल्या चार महिन्यापासून तयारी केली आहे. यासाठी त्यांनी भारताच्या माजी फिरकीपटूला फिरकी सल्लागारपदी नियुक्त केले होते.

Virat Kohli has lost the Pune Test in this Indian spinner | भारताच्या या फिरकीपटूमुळे विराटसेनेनं गमावली पुणे कसोटी

भारताच्या या फिरकीपटूमुळे विराटसेनेनं गमावली पुणे कसोटी

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - पुण्यातील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 333 धावांनी मानहानीजनक पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही डावांत मिळून सामन्यात 70 धावांमध्ये 12 बळी घेणारा फिरकीपटू ओकिफी ऑस्ट्रेलियाच्या विजयाच सुत्रधार ठरला. ऑस्ट्रेलियनं संघाने भारताला पराभूत करण्यासाठी गेल्या चार महिन्यापासून तयारी केली आहे. यासाठी त्यांनी भारताच्या माजी फिरकीपटूला फिरकी सल्लागारपदी नियुक्त केले होते.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळण्यास सक्षम बनविण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माजी भारतीय फिरकीपटू श्रीराम श्रीधरनची फिरकी सल्लागारपदी नियुक्ती केली. तर इंग्लंडचा फिरकीपटू माँटी पनेसरची फिरकी गोलंदाज सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. ऑस्ट्रेलियाला माहित होतं की भारत दौऱ्यात त्यांना फिरकीसाठी चांगल्या स्पिचचा सामना करावा लागणार आहे. यामुळे पुण्याच्या क्यूरेटरने पिचमध्ये बाउंस असल्याचं म्हटल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने स्पिनर्सला खेळवलं. कंगारुंनी यावेळेस फिरकीसोबत चांगली तयारी केली आहे.

40 वर्षीय श्रीराम यांनी 29 जानेवारीला स्पिन कंसल्टंट म्हणून दुबईला गेले. जेथे ऑस्ट्रेलिया टीमचे काही सदस्य होते जे प्रॅक्टीस करत होते. त्यांनी भारत दौऱ्यात येण्याआधीच अश्विन आणि जडेजा यांच्या बॉलिंगचा सामना कसा करायचा याबाबतच्या टीप्स ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दिल्या. त्याबरोबरच भारतीय फलंदाजांची कुमकुवत बाजू काय आहेत. भारतीय खेळपट्यावर कशी गोलंदाजी करावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. याचा फायदा ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत घेतला आणि 19 सामन्यांत अपराजित राहण्याचा भारताचा अश्वमेध ऑस्ट्रेलियाने रोखला.

श्रीधरनने भारतातर्फे मार्च 2000 ते डिसेंबर 2004 या कालावधीत ८ वन-डे सामने खेळले आहेत. त्यांनी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया संघाची श्रीलंका दौऱ्यात आणि भारतात खेळल्या गेलेल्या विश्व टी-२० स्पर्धेदरम्यान मदत केली होती. सिडनीमध्ये क्लब क्रिकेटपटू म्हणून खेळत असलेल्या ३४ वर्षीय पानेसरने 2012-13 मध्ये इंग्लंडला भारतात संस्मरणीय विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याची निवड केली आहे. पनेसरने त्यावेळी तीन कसोटी सामन्यांत 17 बळी घेतले होते.

Web Title: Virat Kohli has lost the Pune Test in this Indian spinner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.