विराट कोहली क्लासलेस आणि अहंकारी - ऑस्ट्रेलियन मीडिया
By Admin | Updated: March 29, 2017 18:59 IST2017-03-29T13:55:08+5:302017-03-29T18:59:09+5:30
चौथ्या कसोटी सामन्यातील विजयानंतर आस्ट्रेलियाच्या द डेली टेलिग्राफने विराटवर टीका करताना क्लासलेस, बालिश आणि अंहकारी असल्याची टीका केली आहे.

विराट कोहली क्लासलेस आणि अहंकारी - ऑस्ट्रेलियन मीडिया
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - भारताचा कर्णधार विराट कोहली याला ऑस्ट्रेलियन मीडियाने पुन्हा एकदा टार्गेट केले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन मीडियाने कोहलीला टार्गेट करीत 'शेषनाग' आणि 'क्रिकेट मधील डोनाल्ड ट्रम्प' असे संबोधले होते. चौथ्या कसोटी सामन्यातील विजयानंतर आस्ट्रेलियाच्या 'द डेली टेलिग्राफ'ने विराटवर टीका करताना क्लासलेस, बालिश आणि अंहकारी असल्याची टीका केली आहे.
नवी दिल्ली, दि. 29 - भारताचा कर्णधार विराट कोहली याला ऑस्ट्रेलियन मीडियाने पुन्हा एकदा टार्गेट केले आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन मीडियाने कोहलीला टार्गेट करीत 'शेषनाग' आणि 'क्रिकेट मधील डोनाल्ड ट्रम्प' असे संबोधले होते. चौथ्या कसोटी सामन्यातील विजयानंतर आस्ट्रेलियाच्या 'द डेली टेलिग्राफ'ने विराटवर टीका करताना क्लासलेस, बालिश आणि अंहकारी असल्याची टीका केली आहे.
ऑस्ट्रेलियातील डेली टेलिग्राफमधील वृत्तात असं म्हटलं आहे की, मालिका विजयानंतर विराट कोहलीने हस्तांदोलन करुन मैदानावरील सर्व सोडून खिलाडू वृत्ती दाखवत नव्याने सुरुवात करायला हवी होती. पण त्याचे वर्तन अतिशय बालिश होते. ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनी विराटला अहंकारी आणि क्लासलेस, असेही म्हटलं आहे. "Beergate: Kohli's latest classless act" अशा पद्धतीच्या मथळ्यासह त्यांनी विराटची बातमी प्रसिद्ध केली आहे.
या मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूतील दुबळ्या आणि कमकुवत बाजू समोर आल्या. भारतीय खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्तीचा अभाव असल्याचे या लेखात म्हटलं आहे. आस्ट्रेलियाने स्मिथ आणि कोहलीची तुलना केली आहे. यामध्ये त्यांनी स्मिथच्या खिलाडू वृत्तीचे स्तुती केली आहे. मालिकेनंतर त्यांने मुरली विजयची माफी मागून आपल्यातील खिलाडू वृत्ती दाखवून दिली आहे. तर कोहलीने ऑस्ट्रेलियान खेळाडूशी कधीही मैत्री होऊ शकत नाही असे म्हणत आपल्यात खिलाडू वृत्ती नसल्याचे दाखवून दिले आहे. विराटने त्याच्या वर्तनाबद्दल स्मिथची माफी मागण्याचा फुकटचा सल्लाही ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने देऊ केला आहे.
दरम्यान, बंगळुरू कसोटी सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंकडून एकमेकांवर जोरदार शेरेबाजी पाहायला मिळाली. रंगतदार झालेल्या या सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह सर्वच खेळाडू चांगलेच भडकले होते. स्मिथने जे काही केलं त्यावर मैदानाबाहेरूनही चांगलीच टीका झाली होती. पण या प्रकरणावर विराटने स्मिथची माफी मागवी, असे ऑस्ट्रेलियन मीडियाने म्हटले आहे.
स्मिथच्या प्रामाणिकपणाचे सीएकडून कौतुक
स्टीव्ह स्मिथने मालिकेदरम्यान अनेकदा भावनेच्या भरात चुकीचे वर्तन केल्याबद्दल माफी मागितली, तसेच चुकांची कबुली दिल्याबद्दल क्रिकेट आॅस्ट्रेलियाने आपल्या कर्णधाराच्या प्रामाणिक हेतूचे तसेच संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. संघाच्या प्रयत्नांवर आम्हाला गर्व वाटतो. या दौऱ्यात खेळाडूंची समर्पितवृत्ती आणि प्रामाणिक हेतू यामध्ये कसलीही उणीव जाणवली नसल्याचे सीएने म्हटले आहे.
परिपक्वता दाखवायला हवी!
क्रिकेटपटू सोबत आणि विरोधात खेळतच असतात. अशा वेळी कटुता टाळायला हवी. एखाद्या मालिकेत मनाविरुद्ध काही घडल्यास निराशा वाढते. पण संयम बाळगणे अर्थात परिपक्व होणे हे चांगुलपणाचे लक्षण ठरते.- मार्क टेलर.
...................
क्रिकेट केवळ जय-पराजयापुरते मर्यादित नाही तर खेळता खेळता तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनू शकता, हे विराटने शिकायला हवे. - डीन जोन्स.
...........................
विराटचे वक्तव्य निराशादायी असले तरी ते त्याचे मत आहे. अन्य भारतीय खेळाडू विराटच्या वक्तव्याशी सहमत असतीलच असे नाही. मी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वावर फारच प्रभावित आहे. - डेरेन लेहमन.