अनुष्का शर्मासोबत विराटने साजरा केला व्हॅलेंटाइन डे
By Admin | Updated: February 16, 2017 00:43 IST2017-02-16T00:43:54+5:302017-02-16T00:43:54+5:30
क्रिकेटमधील अत्यंत लोकप्रिय व दमदार खेळाडू विराट कोहली याने व्हॅलेंटाईन डे आपली मैत्रीण व अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत साजरा

अनुष्का शर्मासोबत विराटने साजरा केला व्हॅलेंटाइन डे
क्रिकेटमधील अत्यंत लोकप्रिय व दमदार खेळाडू विराट कोहली याने व्हॅलेंटाईन डे आपली मैत्रीण व अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत साजरा केला. क्रिकेटच्या इतिहासात एका हंगामात चार द्विशतके करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. विराट आणि अनुष्का अनेक प्रसंगांत, कार्यक्रमांत एकमेकांसोबत दिसलेले आहेत तरीही त्या दोघांनी त्यांचे नाते नेमके काय आहे हे सांगितलेले नाही. विराट कोहली जानेवारी २०१६ पासून क्रिकेटमध्ये अत्यंत यशस्वी ठरत आला असून अनुष्का तिची भूमिका असलेल्या ‘सुलतान’ आणि ‘ए दिल हैं मुश्कील’ चित्रपटांच्या यशाने खूपच चर्चेत आहे. विराटने २३ कसोटी सामन्यांत नेतृत्व करताना १५ विजय मिळवले व त्याने वैयक्तिक पातळीवरही भरपूर धावा जमवल्या आहेत. कसोटी सामन्यांत १५ विजय मिळवणाऱ्या विराटनंतर आॅस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ हाच एकमेव कप्तान आहे.
तुम्हाला हवे असेल तर प्रत्येक दिवस व्हॅलेंटाइन डे असतो
विराट कोहलीने ट्विटरवर अनुष्का व स्वत:चा फोटो टाकून म्हटले की ‘तुम्हाला तसे हवे असेल तर प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाइन डे असतो.’
त्यावर अनुष्काने म्हटले की,‘तुम्हाला तसे हवे असेल तर प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाइन डे असतो. तू प्रत्येक दिवस माझ्यासाठी तसाच केला आहेस.’