विराट कोहलीने तोडला सेहवागचा 'हा' रेकॉर्ड

By Admin | Updated: February 10, 2017 14:03 IST2017-02-10T14:02:40+5:302017-02-10T14:03:50+5:30

बांगलादेविरोधात खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने विरेंद्र सेहवागचा 12 वर्षांपुर्वीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे

Virat Kohli breaks Sehwag's 'Ha' record | विराट कोहलीने तोडला सेहवागचा 'हा' रेकॉर्ड

विराट कोहलीने तोडला सेहवागचा 'हा' रेकॉर्ड

>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 10 - बांगलादेविरोधात खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने अजून एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. विराट कोहलीने मायदेशात एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. विराट कोहलीने 15 डावांत 1116 धावा केल्या आहेत. यासोबतच विराट कोहलीने विरेंद्र सेहवागचा 12 वर्षांपुर्वीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. विरेंद्र सेहवागने 2004-05 मध्ये 17 डावांत 69.06 च्या सरासरीने 1105 धावा केल्या होत्या. 
 
(हैदराबाद टेस्टमध्ये विराट कोहलीने मारला द्विशतकांचा 'चौकार')
 
विराट कोहलीने तब्बल 93 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने चार शतक आणि दोन अर्धशतक ठोकले आहेत. विशेष बाब म्हणजे यावेळी विराट कोहलीने एकदाही शुन्यावर बाद झाला नाही. विरेंद्र सेहवागने 2004-05 मध्ये चार शतक लगावले होते. यामध्ये सेहवागची तीन अर्धशतकं होती. सेहवाग एकदा शुन्यावर बाद झाला होता. 
 
(बॉल बॅटच्या मध्यभागी लागूनही बांगलादेशने घेतला रिव्ह्यू, विराटला हसू आवरेना)
 
घरच्या मैदानावर एका मोसमात सर्वात जास्त धावा करण-या पाच फलंदाजांमधील चार खेळाडू भारतीय आहेत. विराट कोहली आणि विरेंद्र सेहवाग यांच्याशिवाय सुनील गावसकर आणि दिलीप वेंगसरकर यांचाही या यादीत समावेश आहे. 
 
रेकॉर्डच्या या यादीत इंग्लंडचे माजी कर्णधार ग्राहम गूच यांचंही नाव असून 1990 मध्ये त्यांनी घरच्या मैदानावर एका मोसमात 1058 धावा केल्या होत्या. गूच यांनी यावेळी 96.18 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. त्यांनी चार शतकं तर तीन अर्धशतकं लगावली होती. गूच एकदा शुन्यावर बाद झाले होते. 
 
भारताचे माजी कप्तान सुनील गावसकर चौथ्या क्रमांकावर असून 1979-80 मध्ये 21 डावांत 51.35 च्या सरासरीने त्यांनी 1027 धावा केल्या होत्या. गावसकरांनी तीन शतकं आणि चार अर्धशतकं ठोकली होती. 
 
दिलीप वेंगसरकर पाचव्या स्थानावर असून 1986-1987 मध्ये 13 डावांत 107.33 च्या सरासरीने चार शतकं आणि तीन अर्धशतकांच्या मदतीने त्यांनी 966 धावा केल्या होत्या. 
 

Web Title: Virat Kohli breaks Sehwag's 'Ha' record