कर्णधारपदासाठी धोनीनंतर विराट सवरेत्तम

By Admin | Updated: November 12, 2014 00:42 IST2014-11-12T00:42:58+5:302014-11-12T00:42:58+5:30

भारताला आपल्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्ध मालिका विजय मिळवून देणारा प्रभारी कर्णधार विराट कोहलीकडे संघाचे कर्णधारपद सोपविण्याबाबत पुन्हा एकदा चर्वित चर्वण सुरू झाले आहे.

Virat Kohli best after Dhoni | कर्णधारपदासाठी धोनीनंतर विराट सवरेत्तम

कर्णधारपदासाठी धोनीनंतर विराट सवरेत्तम

सुनील गावसकर व राहुल द्रविड यांचे मत :चर्चा केल्यास  दडपण येण्याची शक्यता
नवी दिल्ली : भारताला आपल्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्ध मालिका विजय मिळवून देणारा प्रभारी कर्णधार विराट कोहलीकडे संघाचे कर्णधारपद सोपविण्याबाबत पुन्हा एकदा चर्वित चर्वण सुरू झाले आहे. माजी कर्णधार सुनील गावस्कर व राहुल द्रविड यांच्या मते सध्या या पदासाठी महेंद्रसिंग धोनी योग्य व्यक्ती आहे.
श्रीलंकेविरुद्ध पाच वन-डेच्या मालिकेसाठी धोनीच्या अनुपस्थितीत विराटकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याचप्रमाणो ऑस्ट्रेलिया दौ:यातील पहिल्या कसोटी सामन्यात हा युवा फलंदाज कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. पण, विराटकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्याची घाई करण्यात येवू नये, असे मत गावस्कर व द्रविड यांनी व्यक्त केले आहे. 
गावस्कर म्हणाले, ‘धोनी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्यास तयार आहे तोर्पयत विराटकडे ही जबाबदारी सोपविण्याबाबत विचार करायला नको. विराटकडे कर्णधारपद सोपविण्याची घाई करण्यात येवू नये. अशाप्रकारच्या चर्चा करताना धोनी व विराट या दोन्ही खेळाडूंवर दडपण येण्याची शक्यता आहे. कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणो विराटसाठी चांगली संधी आहे, पण केवळ एका सामन्यावरुन त्याच्या कामगिरीचे आकलन करता येणार नाही. त्याच्याकडे बराच कालावधी शिल्लक आहे. सध्या उपकर्णधारपदाची जबाबदारी त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. या भूमिकेतही फलंदाजीचा क्रम व गोलंदाजीबाबत लक्ष द्यावे लागते. त्यामुळे उपकर्णधारपदाची जबाबदारी त्याला शिकण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.’ विराट कर्णधारपदासाठी लायक आहे, पण त्याच्याकडे ही जबाबदारी धोनीने हे पद सोडल्यानंतर देणो योग्य ठरेल, असे मत माजी कर्णधार द्रविडने व्यक्त केले. 
द्रविड म्हणाला, ‘धोनीच्या अनुपस्थितीत विराटला कर्णधारपदाची भूमिका बजाविण्यास सज्ज असल्याचे सिद्ध करण्याची संधी राहिल, पण माङया मते हा धोनीचा संघ आहे. कर्णधार म्हणून विराटच्या कामगिरीचे आकलन केवळ एका कसोटी सामन्यावरुन करणो चुकीचे आहे. विराटच्या नेतृत्व क्षमतेबाबत केवळ एका कसोटी सामन्यावरून आकलन करणो चुकीचे आहे. त्याला क्रिकेटचे चांगले ज्ञान असून तो कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी उपयुक्त उमेदवार आहे. माङया मते धोनीने कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडल्यानंतर विराट या पदासाठी योग्य व्यक्ती आहे.’ कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे विराटच्या वैयक्तिक कामगिरीवर फरक पडेल का? याबाबत बोलताना द्रविड म्हणाला, ‘कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे विराट वैयक्तिक कामगिरीबाबत अधिक विचार करीत नसेल. कारण त्याला त्यावेळी अन्य बाबींबाबतही विचार करावा लागतो. तो अनुभवातून बरेच काही शिकेल.’ (वृत्तसंस्था)

 

Web Title: Virat Kohli best after Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.