विराट कोहली आणि धोनीच्या मुलीचा फोटो सोशल मिडियावर हिट

By Admin | Updated: March 30, 2016 18:48 IST2016-03-30T18:48:04+5:302016-03-30T18:48:04+5:30

विराट कोहलीचे चाहते त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उत्सुक असतात. मात्र, याच विराटला कर्णधार एम.एस. धोनीची सुंदर मुलगी झिवीसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाहीये.

Virat Kohli and Dhoni's daughter's photo hit on social media | विराट कोहली आणि धोनीच्या मुलीचा फोटो सोशल मिडियावर हिट

विराट कोहली आणि धोनीच्या मुलीचा फोटो सोशल मिडियावर हिट

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३० - भारतीय संघाचा आघाडीची फलंदाज विराट कोहली याने टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरोधात धडाकेबाज फलंदाजी केली आणि भारताला उपांत्य फेरीत जागा मिळवून दिली. यानंतर सर्वत्र विराट कोहलीचे कौतुक होताना दिसत आहे. विराट कोहलीचे चाहते त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उत्सुक असतात. मात्र, याच विराटला कर्णधार एम.एस. धोनीची सुंदर मुलगी झिवीसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाहीये. 
 
विराट कोहलीने झिवासोबत काढलेला सेल्फी सोशल नेटवर्किंग साईट फेसबूक आणि इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 
विराटसोबत काढलेल्या या फोटोमध्ये झिवा एका मोबाईल फोनसोबत खेळताना दिसत आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना विराटने लिहिले आहे की, झिवाने माझा फोन घेतला आहे आणि तो कसा हॅण्डल करायचा हे ती शिकत आहे. लहान मुलं अविश्वसनीय असतात. या लहानग्यांची निरागसता पाहिल्यावर तुम्ही सगळं विसरुन जाता.
 
 
 
 
विराट आणि झिवा यांचा सेल्फी सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर करण्यात आल्यानंतर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोला सोशल मिडियावर उदंड प्रतिसाद मिळत आहे. इंस्टाग्रामवर विराट कोहलच्या २ लाख चाहत्यांनी लाईक केले आहे. तर ६००० जणांनी कमेंट केल्या आहेत.
 

Web Title: Virat Kohli and Dhoni's daughter's photo hit on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.