विराट, जडेजा, शमीची कोटलावर कमाल
By Admin | Updated: October 12, 2014 02:33 IST2014-10-12T02:33:20+5:302014-10-12T02:33:20+5:30
भारताने शनिवारी दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या दुस:या वन-डे लढतीत पाहुण्या विंडीजचा 48धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

विराट, जडेजा, शमीची कोटलावर कमाल
>दुसरी वन-डे : रैनासह धोनीचेही अर्धशतक; विंडिजवर 48 धावांनी मात, मालिकेत 1-1 अशी बरोबरी
नवी दिल्ली : सुरेश रैना (62 धावा), विराट कोहली (62 धावा) व कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद 51) यांच्या चमकदार फलंदाजीनंतर मोहम्मद शमी(4-36) व रविंद्र जडेजा (3-44) यांच्या अचूक मा:याच्या जोरावर भारताने शनिवारी दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या दुस:या वन-डे लढतीत पाहुण्या विंडीजचा 48धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 263 धावांची आव्हानात्मक मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणा:या वेस्ट इंडीज संघाचा डाव 46.3 षटकांत 215 धावांत गुंडाळला. लक्ष्याचा पाठलाग करताना 2 बाद 17क् अशा सुस्थितीत असलेला विंडीजचा डाव 215 धावांत संपुष्टात आला. विंडीजतर्फे ड्वेन स्मिथ (97), किरोन पोलार्ड (4क्) आणि डॅरेन ब्राव्हो (26) यांचा अपवाद वगळता विंडीज संघाच्या अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. भारतातर्फे शमीने 4 तर जडेजाने 3 बळी घेतले. त्याआधी, सुरेश रैना (62 धावा, 6क् चेंडू, 5 चौकार, 2 षटकार), विराट कोहली (62 धावा, 78 चेंडू, 5 चौकार) व कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद 51) यांनी झळकाविलेल्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर भारताने 7 बाद 263 धावांची मजल मारली. रैनाने टी-2क् क्रिकेटमधील फॉर्म कायम राखला तर कोहलीला गृहमैदानावर सूर गवसला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 1क्5 धावांची भागीदारी केली. धोनीने 4क् चेंडूंना सामोरे जाताना नाबाद 51 धावांची खेळी केली. धोनीने वेगवान गोलंदाज जेरोम टेलरच्या डावाच्या अखेरच्या षटकात एक चौकार व एक षटकार ठोकत कारकीर्दीतील 56 वे अर्धशतक पूर्ण केले. रवींद्र जडेजा (क्6) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला, पण भुवनेश्वर कुमारने (18) आक्रमक खेळी केली. रैनाने रवी रामपालच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत आपला निर्धार स्पष्ट केला. रैनाच्या आक्रमक फलंदाजीमध्ये कोहलीला दुस:या टोकाकडून संयमी फलंदाजी करता आली. इंग्लंड दौ:यावर निराशाजनक कामगिरी करणा:या कोहलीने सूर गवसल्याचे संकेत दिले.
टेलरने रैनाला मिडऑफवर तैनात पोलार्डकडे ङोल देण्यास भाग पाडत ही भागीदारी संपुष्टात आणली. विंडीजतर्फे रामपाल व टेलर यांनी सुरुवातीला अचूक मारा केला. टेलरने 54 धावांच्या मोबदल्यात 3 बळी घेतले. टेलरने शिखर धवनला (क्1) माघारी परतवत विंडीज संघाला पहिले यश मिळवून दिले. (वृत्तसंस्था)
भारताच्या डावात अंबाती रायडूचे (32) योगदानही उल्लेखनीय ठरले. (वृत्तसंस्था)
तिसरी लढत विशाखापट्टणममध्येच : बीसीसीआय
विशाखापट्टणम : ‘हुडहुड’ चक्रीवादळानंतरही भारत व वेस्ट इंडीज यांच्यादरम्यान खेळली जाणारी तिसरी वन-डे विशाखापट्टणमऐवजी दुसरीकडे हलविण्याची शक्यता बीसीसीआयने फेटाळून लावली. यजमान आंध्र क्रिकेट संघटनेने 14 ऑक्टोबरला आयोजित लढत कुठल्याही अडथळ्याविना होईल, अशी आशा व्यक्त केली. बीसीसीआयचे सचिव संजय पटेल म्हणाले, ‘आता सामना अन्य ठिकाणी हलविणो अडचणीचे आहे. खेळाडूंच्या कार्यक्रमात बदल करणो शक्य आहे; पण प्रसारण करणा:या वाहिनीच्या कार्यक्रमात बदल करणो अडचणीचे आहे.’ ‘हुडहुड’ चक्रीवादळ रविवारी शहरात दाखल होण्याची शक्यता आहे. पावसाला सुरुवात झाली आहे. आंध्र क्रिकेट संघटनेचे सचिव गंगाराजू म्हणाले, ‘मैदानावर एक थेंबही पाणी साचणार नाही, याची व्यवस्था केलेली आहे.’
भारत :- अजिंक्य रहाणो ङो. ब्राव्हो गो. सॅमी 12, शिखर धवन त्रि. गो. टेलर क्1, अंबाती रायडू ङो. सॅमी गो. बेन 32, कोहली ङो. सॅम्युअल्स गो. रामपाल 62, सुरेश रैना ङो. पोलार्ड गो. टेलर 62, महेंद्रसिंग धोनी नाबाद 51, रवींद्र जडेजा त्रि. गो. टेलर क्6, भुवनेश्वर कुमार ङो. पोलार्ड गो. ब्राव्हो 18, मोहम्मद शमी नाबाद क्1. अवांतर (18). एकूण 5क् षटकांत 7 बाद 263. गोलंदाजी : रामपाल 8-क्-47-1, टेलर 1क्-क्-54-3, बेन 1क्-क्-47-1, ब्राव्हो 8-क्-51-1, सॅमी 4-क्-14-1, सॅम्युअल्स 5-1-21-क्, रसेल 3-क्-14-क्, पोलार्ड 2-क्-1क्-क्.
वेस्ट इंडीज :- ड्वेन स्मिथ त्रि. गो. शमी 97, डॅरेन ब्राव्हो त्रि. गो. शमी 26, पोलार्ड त्रि. गो. मिश्र 4क्, सॅम्युअल्स ङो. कोहली गो. यादव 16, रामदिन ङो. रैना गो. मिश्र क्3, ड्वेन ब्राव्हो ङो. धवन गो. शमी 1क्, रसेल यष्टिचित धोनी गो. जडेजा क्4, डॅरेन सॅमी त्रि. गो. जडेजा क्1, रवी रामपाल ङो. व गो. शमी 16, जेरोम टेलर ङो. भुवनेश्वर गो. जडेजा क्क्, बेन नाबाद क्क्. अवांतर (2). एकूण 46.3 षटकांत सर्वबाद 215. गोलंदाजी : भुवनेश्वर 7-क्-32-क्, यादव 9-क्-42-1, शमी 9.3-क्-36-4, जडेजा 9-क्-44-3, मिश्र 1क्-2-4क्-2, कोहली 2-2क्-क्.