यंग एफसी गोवाकडून विराटला अपेक्षा
By Admin | Updated: September 24, 2014 04:02 IST2014-09-24T04:02:12+5:302014-09-24T04:02:12+5:30
इंडियन सुपर लीगच्या लिलावाप्रसंगीच आम्ही युवा खेळाडूंवर ‘फोकस’ केला होता. या संघात ‘यंग’ खेळाडू आहेत त्यातच महान फुटबॉलपटू झिको आणि आर्सेनलचा स्टार खेळाडू रॉबर्ट पिरीस यांनी भर टाकली

यंग एफसी गोवाकडून विराटला अपेक्षा
सचिन कोरडे, मुंबई
इंडियन सुपर लीगच्या लिलावाप्रसंगीच आम्ही युवा खेळाडूंवर ‘फोकस’ केला होता. या संघात ‘यंग’ खेळाडू आहेत त्यातच महान फुटबॉलपटू झिको आणि आर्सेनलचा स्टार खेळाडू रॉबर्ट पिरीस यांनी भर टाकली. त्यामुळे या युवा खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे गोवा एफसी संघाचा सह मालक विराट कोहलीने स्पष्ट केले.
सुरुवातीला केवळ गोवा संघाचा बॅ्रण्ड अॅम्बेसेडर म्हणून चर्चेत असलेला विराट सोमवारी अॅम्बेसेडर आणि सह मालक म्हणून सर्वांसमोर आला आणि उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मुंबईत आयोजित कार्यक्रमात हा गौप्यस्फोट करण्यात आला.
आयएसएल स्पर्धेतील एफसी गोवा संघाचा ‘मार्की’खेळाडू रॉबर्ट पिरेस याचे ‘लाँचिंग’ झाले. या वेळी फुटबॉल स्पोटर््स डेव्हलपमेंटच्या अध्यक्षा नीता अंबानी, एफसी गोवा फ्रेन्चायझीचे सहमालक श्रीनिवास धेंपे, दत्तराज साळगावकर,
वेणुगोपाल धूत, संघाचे प्रशिक्षक झिको, संघाचा पहिला मित्र अभिनेता वरुण धवन याशिवाय फुटबॉल क्षेत्रातील दिग्गजउपस्थित होते.
फ्रान्सचा आंतरराष्ट्रीय तसेच आर्सेनलचा स्टार रॉबर्ट पिरीस याला एफसी गोवाने आपल्या ताफ्यात ओढले. विश्वचषक आणि युरो चषकविजेत्या संघाचा खेळाडू असलेल्या रॉबर्टच्या आगमनामुळे एफसी गोवा अधिक मजबूत झाला आहे. त्यामुळे विराट कोहलीने संघाच्या निवडीवर समाधान व्यक्त केले.