विराट म्हणजे क्रिकेटमधला डोनाल्ड ट्रम्प

By Admin | Updated: March 22, 2017 00:11 IST2017-03-22T00:11:15+5:302017-03-22T00:11:15+5:30

भारत-आॅस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत अनेकदा खेळाडूंमध्ये होणारी शाब्दिक वादावादी ठसनमध्ये बदलून जाते.

Virat is Donald Trump in Cricket | विराट म्हणजे क्रिकेटमधला डोनाल्ड ट्रम्प

विराट म्हणजे क्रिकेटमधला डोनाल्ड ट्रम्प

नवी दिल्ली : भारत-आॅस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत अनेकदा खेळाडूंमध्ये होणारी शाब्दिक वादावादी ठसनमध्ये बदलून जाते. बंगळुरू कसोटीमध्ये सुरू झालेल्या डीआरएसच्या खोटारडेपणाचा वाद काही थांबताना दिसत नाहीये. रांची कसोटीनंतर आॅस्ट्रेलियातील वृत्तपत्र 'द डेली टेलिग्राफ' ने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली आहे. २८ वर्षीय भारतीय कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटमधील डोनाल्ड ट्रम्प आहे असे एका लेखात म्हणत आॅस्ट्रेलियाच्या माध्यमाने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे.
प्रतिस्पर्धी संघ आणि प्रतिस्पर्धी मीडियाला विराट कोहली नेहमीच जशास तसे प्रत्युत्तर देत असतो. आॅस्ट्रेलियन मीडियाच्या या वादग्रस्त लेखानंतर विराट कोहलीने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. क्रीडा समीक्षक हर्षा भोगले, माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आॅस्ट्रेलियाच्या मीडियावर टीका करत खंत व्यक्त केली आहे. 'द डेली टेलिग्राफ'च्या एका लेखामध्ये विराट कोहली जागतिक खेळातील डोनाल्ड ट्रम्प आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्पप्रमाणे चुका दाखवल्यास विराट कोहली माध्यमांना दोष देतो.
यापूवीर्ही, 'द डेली टेलिग्राफ' ने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. दुस?्या कोसाटीनंतर कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट दिल्यानंतर कुंबळे रागाच्या भरात अंपायरच्या रूममध्ये गेला आणि आउट का दिलं याबाबत स्पष्टीकरण मागितलं, तर मॅच संपल्यानंतर कोहलीने आॅस्ट्रेलियाच्या अधिका-यांवर स्पॉर्ट्स ड्रिंकची बाटली फेकली, त्यामध्ये एक अधिकारी जखमी झाला, असा आरोप टेलीग्राफने केला आहे. भारत-आॅस्ट्रेलियातील चार कसोटी सामन्याची मालिका १-१ अशी बरोबरीत असून चौथा आणि शेवटचा कसोटी सामना धरमशाला येते खेळला जाणार आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: Virat is Donald Trump in Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.