IPLमुळे चौथ्या कसोटीत विराट खेळला नाही - हॉज

By Admin | Updated: March 27, 2017 19:15 IST2017-03-27T18:47:51+5:302017-03-27T19:15:19+5:30

भारतीय कर्णधार विराट कोहलीवर तोंडसुख घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन मंडळींच्या यादीत आणखी एका माजी कसोटीवीराची भर

Virat did not play Virat in fourth Test - Hodge | IPLमुळे चौथ्या कसोटीत विराट खेळला नाही - हॉज

IPLमुळे चौथ्या कसोटीत विराट खेळला नाही - हॉज

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - भारतीय कर्णधार विराट कोहलीवर तोंडसुख घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन मंडळींच्या यादीत आणखी एका माजी कसोटीवीराची भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीवीर ब्रॅड हॉजने विराट कोहलीवर बोचरी टीका केली आहे. खांद्याला झालेल्या दुखापतीनंतर विराटने चौथ्या कसोटीतून माघार घेतल्यानंतर त्याच्यावर हॉजने टीका केली आहे. विराट कोहलीने दुखापतीमुळे नाही तर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी चौथ्या कसोटीतून माघार घेतल्याची टीका हॉजने केली आहे.
चार कसोटी सामन्यांची मालिका आता संपण्यास दोन दिवस बाकी आहेत. तरी बोचरी टीका करण्याचा ऑस्ट्रेलियन मंडळींचा शौक अजूनही पूर्ण होताना दिसत नाही. ब्रॅड हॉजचा आरोप आहे की, विराटने आयपीएलमध्ये खेळता यावं म्हणून चौथ्या कसोटीतून विश्रांती घेतली आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात जर विराट खेळला तर ते खूप वाईट असेल असेही तो म्हणाला आहे. आयपीएलमध्ये हॉज गुजरात लायन्स संघाचा प्रशिक्षक आहे.
पुण्यातील पहिल्या कसोटीनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर ऑस्ट्रेलियन मंडळींकडून टीकेचं सत्र सुरू झालं आहे. बंगळुरु कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि विराटमध्ये डीआरएसवरून वाद झाला होता. चार कसोटी सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तर चौथ्या कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व निर्माण केले आहे. भारताला विजयासाठी 87 धावांची आवश्यकता आहे.

Web Title: Virat did not play Virat in fourth Test - Hodge