विराटला डिवचून चूक केली - जॉन्सन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2016 19:55 IST2016-04-06T19:55:20+5:302016-04-06T19:55:20+5:30
वर्ल्डकपच्यावेळी विराट कोहलीला डिवचून आपण चूक केली अशी कबुली ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने दिली आहे.

विराटला डिवचून चूक केली - जॉन्सन
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - वर्ल्डकपच्यावेळी विराट कोहलीला डिवचून आपण चूक केली अशी कबुली ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने दिली आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी जॉन्सनने टि्वटरवरुन विराटची खोडी काढली होती.
त्याने विराटला टोले लगावले होते. हे सर्व करण्यामागे विराटवर दबाव वाढवण्याची रणनिती होती. पण प्रत्यक्षात झाले उलटेच विराटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी यथेच्छ धुलाई करत एकहाती सामना फिरवला. त्याने नाबाद ८२ धावांची खेळी केली.
आता आयपीएलच्या ९ व्या मोसमात जॉन्सन किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यानिमित्ताने त्याने विराट आणि त्याच्यामध्ये मैदानावर जे व्दंद रंगते त्याला उजाळा दिला आहे