दिग्गजांनी थोपटली ' विराट सेनेची' पाठ

By Admin | Updated: March 7, 2017 20:59 IST2017-03-07T15:59:29+5:302017-03-07T20:59:19+5:30

दुस-या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर ७५ धावांनी विजय मिळवताच सचिन तेंडुलकरसह दिग्गजानी त्यांचे कौतुक केले.

'Viraat Sanechi' lessons are written by veterans | दिग्गजांनी थोपटली ' विराट सेनेची' पाठ

दिग्गजांनी थोपटली ' विराट सेनेची' पाठ

ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. ७ - पुण्यात झालेल्या दारूण पराभवाचा बदला घेत भारतीय संघाने बंगळुरूत 'ऑस्ट्रेलिया'च्या संघाला धूळ चारली. दुस-या कसोटीच्या चौथ्या दिवशी अश्विन आणि उमेस यादवच्या गोलंदाजीमुळे भारताने ऑस्ट्रेलियावर ७५ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाच्या या दणदणीत विजयामुळे खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवागसह टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.

हाती अवघ्या 187 धावा असताना रविचंद्रन अश्विनने टिपलेले सहा बळी आणि त्याला उमेश यादव आणि रवींद्र जडेजाकडून मिळालेल्या सुरेख साथीच्या जोरावर भारताने बंगळुरू कसोटी ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. त्याबरोबरच चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली. सामन्यातील दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलने सामनावीराचा मान पटकावला. 

Web Title: 'Viraat Sanechi' lessons are written by veterans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.