Vinesh Phogat second gold | विनेश फोगटला दुसरे सुवर्ण
विनेश फोगटला दुसरे सुवर्ण

इस्तंबूल : भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटने यासर डोगू आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ५३ किलो वजन गटात सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. विनेशने रशियाच्या कॅटरिना पोलेस्चूक हिला ९-५ अशा गुणांनी पराभूत केले. भारताच्या सीमाने ५० किलो, तर मंजूने ५९ किलो वजनगटात यापूर्वीच सुवर्णपदक पटकावले आहे.
माद्रीदमध्ये सुवर्णपदक जिंकणारी दिव्या काकरान व रौप्यपदक विजेती पूजा ढांडा यांना मात्र पदक मिळवण्यात अपयश आले. दिव्या पात्रता फेरीत तर पूजा उपांत्यफेरीत पराभूत झाली. किरकोळ दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या साक्षी मलिकलाही चमकदार कामगिरी करता आली नाही. दीपक पूनियाने ८६ किलो वजन गटात रौप्यपदक मिळवले. त्याला अंतिम सामन्यात अझरबैजानच्या अलेक्सांद्र गोस्तियेव याच्याकडून ७—२ ने पराभूत झाला. सुमीतने १२५ किलो वजनगटात कांस्यपदक मिळवत भारताच्या पदकसंख्येत भर घातली.
बंजरंग पूनियाच्या अनुपस्थितीत खेळणाºया तानाजी गोंगाने याला ६५ किलो वजन गटात कास्यपदकाच्या लढतीत तुर्कीच्या सेंगीजान इरोडगन याच्याकडून पराभूत व्हावे लागले. भारताचे रजनिश (७०), विकी (९२) कास्यपदकाच्या लढतीत पराभूत झाले. (वृत्तसंस्था)


Web Title: Vinesh Phogat second gold
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.