शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

'ती एका विजेत्याप्रमाणे पुनरागमन करेल', विनेशच्या अपात्रेवर अमित शाहंची प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 15:40 IST

काही ग्राम वजन जास्त भरल्यामुळे कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर काढण्यात आले आहे.

Vinesh Phogat disqualified, Wrestling India in Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या सुवर्णपदकाच्या मोहिमेला मोठा धक्का बसला. भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) वजन वाढल्याचे कारण देत स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान, विनेशला अपात्र ठरल्यावर गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तिच्यासाठी ट्विट केले.

अमित शाह म्हणाले की, "विनेश फोगट ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यामुळे कोट्यवधी भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. पण, एका विश्वविजेत्या पैलवानाचा पराभव करुन तिने तिची कारकीर्द चमकावली आहे. हा धक्का तिच्या कारकीर्दीतील एक अपवाद आहे, ज्यातून ती एका विजेत्याप्रमाणे पुनरागमन करेल, याची मला खात्री आहे. आमच्या शुभेच्छा आणि पाठींबा सदैव तिच्यासोबत असतील," असे ट्विट शाह यांनी केले.

पीएम मोदींनी दिला धीरविनेशवर झालेल्या अपात्रतेच्या कारवाईनंतर पीएम मोदींनी तिच्यासाठी ट्विट केले. ते म्हणाले, "विनेश, तू मोठी चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी तू प्रेरणा आहात. आजचा भारताला बसलेला धक्का दु:खदायक आहे. मला झालेले दु:ख मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या निर्णयाने साऱ्यांनाच प्रचंड निराशा झाली आहे. पण, मला माहित आहे की तू फायटर आहेस. आव्हाने स्वीकारणे हा तुझा स्वभाव आहे. दमदार पुनरागमन कर! आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत," असे धीर देणारे ट्विट मोदींनी केले.

पंतप्रधानांची IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चापंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून या विषयावर आणि विनेशच्या धक्क्यानंतर भारताकडे कोणकोणते पर्याय आहेत, याबद्दल प्रथम माहिती घेतली. विनेश प्रकरणात सर्व पर्यायांचा शोध घेण्याची विनंती मोदींनी पीटी उषा यांच्याकडे केली.

राहूल गांधी काय म्हणाले?"विश्वविजेत्या कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठणारी भारताची शान विनेश फोगटला तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरवण्यात आले, हे दुर्दैवी आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटना या निर्णयाला जोरदार आव्हान देईल आणि देशाच्या कन्येला न्याय देईल, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. विनेश हिम्मत गमावणारी नाही, ती आणखी मजबूतपणे रिंगणात परतेल असा आम्हाला विश्वास आहे. विनेश तू नेहमीच देशाचा अभिमान वाढवला आहेस. आजही संपूर्ण देश तुझी ताकद म्हणून तुमच्या पाठीशी उभा आहे," असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

100 ग्रॅम वजनामुळे विनेश फोगटचे पदक हुकले

बुधवारी (7 ऑगस्ट) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत 50 किलो वजनी गटात विनेश फोगटचा सामना अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडशी होता. पण, सामन्यापूर्वी विनेशचे 100 ग्राम वजन जास्त आल्याने तिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले. अपात्रतेमुळे तिला आता कोणतेही पदक मिळणार नाही. 

विनेशसाठी ऑलिम्पिक स्पर्धा खूपच निराशाजनक ठरली आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला दुखापतीमुळे सहभागी होता आले नाही. त्यानंतर 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. यंदा ती पदक जिंकण्याची आशा होती, पण तांत्रिक अडचणींमुळे तिला बाहेर काढण्यात आले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहVinesh Phogatविनेश फोगटparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Wrestlingकुस्ती