विक्रमादित्यची विजयी कूच
By Admin | Updated: November 19, 2015 00:56 IST2015-11-19T00:56:37+5:302015-11-19T00:56:37+5:30
अग्रमानांकीत इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी याच्यासह स्पर्धेतील इतर मानांकीत खेळाडूंनी देखील सहज विजय मिळवताना फीडे मानांकन बुध्दिबळ स्पर्धेत

विक्रमादित्यची विजयी कूच
मुंबई : अग्रमानांकीत इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी याच्यासह स्पर्धेतील इतर मानांकीत खेळाडूंनी देखील सहज विजय मिळवताना फीडे मानांकन बुध्दिबळ स्पर्धेत विजयी सलामी दिली.
ुबोरीवली येथील डॉन बॉस्को शाळेमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत राज्यातील अव्वल खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे एकूण दिड लाख रुपयांच्या बक्षिसांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत चुरशीच्या लढती रंगणार आहेत.
२३०३ इलो रेट असलेल्या अनुभवी विक्रमादित्यने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना मुंबईच्या अनन्या वोराचा (१०४१) सहज पराभव केला. गॅम्बीट पध्दतीने सुरुवात करताना विक्रमादित्यने सुरुवातीपासूनच आक्रमक चाली रचून अनन्याला हतबल केले. त्याच्या आक्रमक व्यूहरचनेसमोर अनन्याने सपशेल हार पत्करली. दुसऱ्या बाजूला पुण्याच्या श्रीनाथ राव यानेही आक्रमक खेळ करताना मुंबईकर हनेल कामदारचा केवळ २४ चालींमध्ये पाडाव केला. काळ्या मोहऱ्यांनी फ्रेंच बचावपध्दतीने सुरुवात करुन त्याने कामदारला चांगलेच जाळ्यात ओढले.
अन्य एका लढतीत राष्ट्रीय
‘ब’ स्पर्धा विजेत्या फिडे
मास्टर अविनाश आवटे (इलो २१३५) याने दणदणीत विजय मिळवताना जीनय मेहताचा (इलो १०२३) सहजपणे धुव्वा उडवला. एकूण १० फेऱ्यांच्या या स्पर्धेत ३१४ खेळाडूंचा समावेश आहे.
अन्य निकाल
अमरदीप एस.(१) वि.वि. तपन जोशी (०); केतन बोरीचा (१) वि.वि. ओम सरोदे (०); एम. एन. अभ्यंकर (१) वि.वि. गौरव मेहता (०); शुभम कुमठेकर (१) वि.वि. श्रावणी पाटील (०); राजाबाबू गजेंगी (१) वि.वि. देवदत्त पटेल (०); वेदांत पानेसर (१) वि.वि. आरव भट्टाचार्य (०).