धोनीचा यष्टिमागे विक्रम
By Admin | Updated: January 30, 2016 00:17 IST2016-01-30T00:17:37+5:302016-01-30T00:17:37+5:30
मेलबर्न : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने शुक्रवारी टी-२० सामन्यादरम्यान दोन मोठे विक्रम स्वत:च्या नावे केले. ऑस्ट्रेलियात द्विपक्षीय मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४० स्टम्पिंग करणारा तो पहिलाच यष्टिरक्षक बनला आहे. लंकेचा माजी यष्टिरक्षक कुमार संगकारा याचा १३९ स्टम्पिंगचा विक्रम आजच त्याने मोडित काढला. धोनीने जडेजाच्या चेंडूवर फॉल्कनरला यष्टिचित करीत हा मान मिळविला.(वृत्तसंस्था)

धोनीचा यष्टिमागे विक्रम
म लबर्न : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने शुक्रवारी टी-२० सामन्यादरम्यान दोन मोठे विक्रम स्वत:च्या नावे केले. ऑस्ट्रेलियात द्विपक्षीय मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४० स्टम्पिंग करणारा तो पहिलाच यष्टिरक्षक बनला आहे. लंकेचा माजी यष्टिरक्षक कुमार संगकारा याचा १३९ स्टम्पिंगचा विक्रम आजच त्याने मोडित काढला. धोनीने जडेजाच्या चेंडूवर फॉल्कनरला यष्टिचित करीत हा मान मिळविला.(वृत्तसंस्था)................................