विजेंदरची विजयी हॅट्ट्रिक

By Admin | Updated: December 20, 2015 23:53 IST2015-12-20T23:53:16+5:302015-12-20T23:53:16+5:30

भारताचा स्टार बॉक्सर विजेंदरसिंह याने व्यावसायिक सर्किटमध्ये आपली जबरदस्त कामगिरी कायम ठेवताना बुल्गारियाच्या सामेत हुसेइनोव्ह याला नमवताना विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.

Vijender's winning hat-trick | विजेंदरची विजयी हॅट्ट्रिक

विजेंदरची विजयी हॅट्ट्रिक

मँचेस्टर : भारताचा स्टार बॉक्सर विजेंदरसिंह याने व्यावसायिक सर्किटमध्ये आपली जबरदस्त कामगिरी कायम ठेवताना बुल्गारियाच्या सामेत हुसेइनोव्ह याला नमवताना विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली.
प्रथमच सहा फेऱ्यांच्या लढतीत सहभागी झालेल्या विजेंदरने दुसऱ्या फेरीत अवघ्या ३५ सेकंदातच हुसेइनोव्हवर ठोशांची बरसात केली. त्यामुळे रेफरीला अखेर ही लढत थांबवावी लागली व भारतीय मुष्टियोद्ध्याला तांत्रिक नॉकआऊटद्वारे विजयी घोषित करावे लागले. आॅक्टोबर महिन्यात व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण करणारा आॅलिम्पिक व विश्व चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता विजेंदरने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये अजूनपर्यंत एकही लढत गमावलेली नाही. त्याने त्याचे तिन्ही विजय नॉकआऊट पद्धतीने तीन फेऱ्यांच्या आतच मिळवले.
विजेंदरची लढत पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती आणि त्यांनी ‘सिंग इज किंग’ या धुनीवर स्टेडियममध्ये प्रवेश केला.
लढतीआधी डरकाळ्या फोडणारा हुसेइनोव्ह विजेंदर रिंगमध्ये उतरताच घाबरलेला दिसला. भारतीय मुष्टियोद्धा विजेंदरने रिंगमध्ये लीलया मुव्हमेंट करताना बुल्गारियाच्या प्रतिस्पर्ध्यास बॅकफूटवर ढकलले. विजेंदरने दमदार जॅब आणि
अपरकटने हुसेइनोव्हला खूप परेशान केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Vijender's winning hat-trick