विजेंदरची मैमतअलीवर टीका, चिनी माल अधिक चालणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:00 IST2017-08-01T00:59:55+5:302017-08-01T01:00:02+5:30
आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता व भारताचा अव्वल व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंगने जुल्फिकार मैमतअलीविरुद्धच्या लढतीपूर्वी वाक् युद्धाला प्रारंभ केला.

विजेंदरची मैमतअलीवर टीका, चिनी माल अधिक चालणार नाही
नवी दिल्ली : आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता व भारताचा अव्वल व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंगने जुल्फिकार मैमतअलीविरुद्धच्या लढतीपूर्वी वाक् युद्धाला प्रारंभ केला. त्याने या बॉक्सरवर टीका करताना लढतीमध्ये झटपट विजय मिळवण्यास प्रयत्नशील असल्याचे सांगितले. चिनी माल अधिक वेळ चालू शकत नाही, अशी टीका विजेंदरने केली.
विजेंदर डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियन आहे, तर जुल्फिकार डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट चॅम्पियन आहे. मुंबईतील वरळीमध्ये एनएससीआय स्टेडियममध्ये उभय खेळाडूंदरम्यान ५ आॅगस्ट रोजी खेळल्या जाणाºया लढतीतील विजेता आपले जेतेपद राखण्यासोबतच प्रतिस्पर्ध्यांच्या किताबावरही नाव कोरणार आहे.
मैमतअलीसोबत ५ आॅगस्ट रोजी होणाºया लढतीबाबत बोलताना विजेंदर म्हणाला, ‘माझा जोरदार सराव सुरू आहे. मी माझे वजन नियंत्रणात राखले आहे. ५ आॅगस्ट रोजी तुम्ही आणखी एका नॉकआऊट निकालाची प्रार्थना करा. ही लढत झटपट संपविण्यास प्रयत्न राहील. तसे चायनीज माल अधिक वेळ टिकत नाही.’
विजेंदर ३१ वर्षांचा आहे, तर त्याचा प्रतिस्पर्धी जवळजवळ नऊ वर्षांनी युवा आहे. चीनच्या बॉक्सरला युवा असल्याचा लाभ मिळेल का, याबाबत बोलताना विजेंदर म्हणाला, ‘त्याचा काही फरक पडेल, असे मला वाटत नाही. बॉक्सिंग हा अनुभवाचा खेळ आहे. तुमच्या ठोशामध्ये ताकद असायला हवी. मला २० वर्षांच्या बॉक्सरप्रमाणे वाटत आहे. मी स्वत:ला जुल्फिकारपेक्षा युवा मानतो.’
या लढतीनंतर आम्हाला राष्ट्रकुलच्या जेतेपदासाठी आव्हान द्यावे लागले. राष्ट्रकुलचे जेतेपद सध्या ब्रिटनच्या बॉक्सरकडे आहे. त्यानंतर इंटर कॉन्टिनेंटल जेतेपदाचा क्रमांक येतो. हे जेतेपद रशियाच्या बॉक्सरकडे आहे. त्यामुळे आम्ही सध्या यापासून पाच-सहा लढती दूर आहोत.’
(वृत्तसंस्था)