विजेंदर विश्व बॉक्सिंग रँकिंगमध्ये दहाव्या स्थानी

By Admin | Updated: August 3, 2016 20:14 IST2016-08-03T20:14:20+5:302016-08-03T20:14:20+5:30

गत महिन्यात आशियाई पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद पटकावणारा भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदरसिंग हा विश्व बॉक्सिंग संघटनेच्या(डब्ल्यूबीओ) रँकिंगमध्ये दहाव्या

Vijender tenth in world boxing ranking | विजेंदर विश्व बॉक्सिंग रँकिंगमध्ये दहाव्या स्थानी

विजेंदर विश्व बॉक्सिंग रँकिंगमध्ये दहाव्या स्थानी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ -  गत महिन्यात आशियाई पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद पटकावणारा भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदरसिंग हा विश्व बॉक्सिंग संघटनेच्या(डब्ल्यूबीओ) रँकिंगमध्ये दहाव्या स्थानावर आला. दहा राऊंडपर्यंत चाललेल्या उत्कंठापूर्ण लढतीत युरोपियन चॅम्पियन केरी होप्स याला पराभूत केले होते.
गेल्यावर्षी व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण केल्यापासून विजेंदर अपराजित आहे. त्याने सलग सात लढती जिंकल्या. त्यातील सहा विजय‘ नॉकआऊट’ होते. विजेंदर हा क्रमवारीत अमेरिकेचा स्टार ट्रॅव्हर मॅकम्बी याच्यापेक्षा वरच्या स्थानावर आहे. मॅकेम्बी देखील आतापर्यंत अपराजित असून त्याने २२ लढती जिंकल्या. त्यातील १७ लढती नॉकआऊट होत्या.
भारताचा पहिला आॅलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदर म्हणाला,‘ माझ्यासाठी ही सुरुवात आहे. विश्व क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याचे माझे स्वप्न आहे.
हे स्थान पटकविण्यात यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो. विजेंदर सध्या भारतात असून बुधवारी त्याने गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेतली. राजनाथसिंग यांनी आशियाई लढतीच्या विजयाबद्दल विजेंदरचे अभिनंदन केले.

Web Title: Vijender tenth in world boxing ranking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.