जागतिक रँकिंगमध्ये विजेंदरला १०वे स्थान
By Admin | Updated: August 4, 2016 03:51 IST2016-08-04T03:51:16+5:302016-08-04T03:51:16+5:30
गत महिन्यात आशियाई पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद पटकावणारा भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदरसिंग हा विश्व बॉक्सिंग संघटनेच्या (डब्ल्यूबीओ) रँकिंगमध्ये दहाव्या स्थानावर आला.

जागतिक रँकिंगमध्ये विजेंदरला १०वे स्थान
नवी दिल्ली : गत महिन्यात आशियाई पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद पटकावणारा भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदरसिंग हा विश्व बॉक्सिंग संघटनेच्या (डब्ल्यूबीओ) रँकिंगमध्ये दहाव्या स्थानावर आला. दहा राऊंडपर्यंत चाललेल्या उत्कंठापूर्ण लढतीत युरोपियन चॅम्पियन केरी होप्स याला पराभूत केले होते.
गेल्या वर्षी व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण केल्यापासून विजेंदरने अपराजित राहण्याचा पराक्रम करताना स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले आहे. त्याने आतापर्यंत सलग सात लढती जिंकल्या. त्यातील सहा विजय ‘नॉकआऊट’ होते. विजेंदर हा क्रमवारीत अमेरिकेचा स्टार ट्रॅव्हर मॅकेम्बी याच्यापेक्षा वरच्या स्थानावर आहे. मॅकेम्बीदेखील आतापर्यंत अपराजित असून त्याने २२ लढती जिंकल्या आहेत. त्यातील १७ लढती नॉकआऊट होत्या. विजेंदर म्हणाला, ‘‘विश्व क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याचे माझे स्वप्न आहे. हे स्थान पटकविण्यात यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो.’’ (वृत्तसंस्था)