विजेंदरला सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार

By Admin | Updated: January 13, 2017 01:19 IST2017-01-13T01:19:19+5:302017-01-13T01:19:19+5:30

स्टार बॉक्सर विजेंदर सिंह याला गुरूवारी दिल्ली क्रीडा पत्रकार संघातर्फे वार्षिक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

Vijender best player award | विजेंदरला सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार

विजेंदरला सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार

नवी दिल्ली : स्टार बॉक्सर विजेंदर सिंह याला गुरूवारी दिल्ली क्रीडा पत्रकार संघातर्फे वार्षिक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्याला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू, तर ज्युनियर हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांना सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून गौरवण्यात आले आहे. त्यासोबत भारताचे आॅलिम्पियन आणि विश्व चॅम्पियन पदकविजेते महान पैलवान आणि प्रशिक्षक महाबली सत्पाल यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
यावेळी प्रशिक्षक हरेंद्र सिंह म्हणाले की, ‘‘मी हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांना सांगितले होते की, आम्ही सुवर्ण पदक जिंकू किंवा मी राजीनामा देईन आणि मी पदक जिंकले.’’ महाबली सत्पाल म्हणाले की,‘‘ फक्त स्टार खेळाडूंकडे लक्ष देण्यापेक्षा युवकांकडेही लक्ष द्यावे.त्यामुळे त्यांना प्रेरणा मिळेल. १९६८मध्ये मी शाळेत असताना मला देखील अशीच प्रेरणा मिळाली होती. ’’
त्यासोबत भारताच्या क्रिकेटचा उगवता तारा ऋषभ पंत याला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. मात्र तो या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नाही.

Web Title: Vijender best player award