विजय क्लबचे थरारक विजेतेपद

By Admin | Updated: February 21, 2015 03:31 IST2015-02-21T03:31:54+5:302015-02-21T03:31:54+5:30

मुंबईच्या विजय क्लबने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे थरारकरीत्या विजेतेपद पटकावले.

Vijay Club's thrilling title | विजय क्लबचे थरारक विजेतेपद

विजय क्लबचे थरारक विजेतेपद

मुंबई: मुंबईच्या विजय क्लबने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे थरारकरीत्या विजेतेपद पटकावले. विजय क्लबने अंतिम सामन्यात गोल्फादेवीला अवघ्या एका गुणाने २२-२१ असे नमवले.
अटीतटीच्या झालेल्या या अंतिम सामन्यात विजयाचे पारडे सतत वर-खाली होत होते. आक्रमक सुरुवात करताना विजय क्लबने गोल्फादेवीवर दडपण आणले. यावेळी निर्णायक लोण देताना विजय क्लबने मध्यंतराला १६-१३ अशी आघाडी घेत वर्चस्व मिळवले.
यानंतर गोल्फादेवीने झुंजार खेळ करताना पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले. विराज उतेकर, अक्षय बिडू आणि विष्णू हरमळकर यांनी अप्रतिम खेळ करताना सामना रंगतदार केला. विजय क्लबच्या श्री भारती, विजय दिवेकर आणि सुनिल मोकल यांनी मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना विजय क्लबचे विजेतेपद निश्चित केले. (क्रीडा प्रतिनिधी)

वैयक्तिक विजेते:
सर्वोत्कृष्ट चढाई: अक्षय बिडू (गोल्फादेवी)
सर्वोत्कृष्ट पकडी: लक्ष्मण दोलतोडे (गोल्फादेवी)
सर्वोत्कृष्ट खेळाडू: श्री भारती (विजय क्लब)

Web Title: Vijay Club's thrilling title