शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

विजय क्लब, गोल्फादेवी यांची उपांत्य फेरीत धडक

By admin | Updated: May 6, 2017 03:05 IST

विजय क्लब आणि गोल्फादेवी या नावाजलेल्या संघांनी आपआपल्या सामन्यात अपेक्षित बाजी मारताना कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विजय क्लब आणि गोल्फादेवी या नावाजलेल्या संघांनी आपआपल्या सामन्यात अपेक्षित बाजी मारताना कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचवेळी, विकास व एस. एस. जी. या संघांनीही चमकदार कामगिरीसह उपांत्य फेरीत आगेकूच केली.वरळी स्पोटर््स क्लबच्या वतीने आदर्शनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत विजय क्लबने मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना ज्ञानदीपचे आव्हान ३२-२१ असे संपुष्टात आणले. पहिल्या सत्रात आक्रमक खेळ करत विजय संघाने १५-८ अशी दमदार आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर विजय संघाने घेतलेल्या सावध भूमिकेचा फायदा घेत ज्ञानदीपने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, राजू नाटेकर, अभिषेक रूपकर व अभिषेक रामाणे यांनी जबरदस्त आक्रमण व बचावाचा खेळ करताना ज्ञानदीपला नमवले. पराभूत संघाकडून राहुल शिरोडकर, ओम्कार येणापुरे यांनी चमक दाखवली.दुसरीकडे, एकतर्फी झालेल्या सामन्यात बलाढ्य गोल्फादेवी संघाने सिद्धिप्रभा संघाचा ५४-१९ असा धुव्वा उडवला. शार्दुल हरचकर, धनंजय सरोज यांच्या आक्रमक चढाया आणि कल्पेश म्हात्रेच्या मजबूत पकडी या जोरावर गोल्फादेवीने मध्यांतरालाच ३४-८ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. यानंतर हीच आघाडी आणखी मजबूत करत गोल्फादेवीने बाजी मारली.अन्य सामन्यात आकाश मयेकर, राज सिंग यांच्या जोरावर विकास संघाने दिलखुश संघाला ४०-१४ असे लोळवले. मध्यांतरालाच १७-७ अशी आघाडी घेतल्यानंतर विकास संघाने दिलखुशला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. एसएसजी संघानेही शानदार विजय मिळवताना श्री साईनाथ ट्रस्टचा ३०-२४ असा पाडाव केला. पंकज मोहिते, सरोज चाचे यांचा अष्टपैलू खेळ एसएसजीच्या विजयात निर्णायक ठरला.