VIDEO- का म्हणतो तेंडुलकर सेहवागला 'लाला'?

By Admin | Updated: October 20, 2016 18:43 IST2016-10-20T18:35:00+5:302016-10-20T18:43:33+5:30

सध्या ट्विटरवर जबरदस्त फलंदाजी करणारा विरू बर्थडेच्या दिवशीही सोशल मिडीयावर चांगली खेळी खेळत आहे. यावेळी सेहवागने क्रिकेटचा भगवान सचिन त्याला 'लाला' का म्हणतो याबाबतही खुलासा केला

VIDEO - Why does Tendulkar say 'Lala' Sehwag? | VIDEO- का म्हणतो तेंडुलकर सेहवागला 'लाला'?

VIDEO- का म्हणतो तेंडुलकर सेहवागला 'लाला'?

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - टीम इंडियाचा माजी धडाकेबाज खेळाडू विरेंद्र सेहवागचा आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्त ट्विटरवर त्याला अनेकजण शुभेच्छा देत आहेत. हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर सारख्या माजी खेळाडुंसह लाखो चाहत्यांनी विरूला शुभेच्छा दिल्या आहेत. 
सध्या ट्विटरवर जबरदस्त फलंदाजी करणारा विरू बर्थडेच्या दिवशीही सोशल मिडीयावर चांगली खेळी खेळत आहे. यावेळी सेहवागने क्रिकेटचा भगवान सचिन त्याला 'लाला' का म्हणतो याबाबतही खुलासा केला आहे. 
सचिनने सेहवागला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देताना हा विरोधी संघाचा फडशा पाडणारा गोड व्यक्ती आहे, हॅप्पी बर्थडे, लाला असं ट्विट केलं. सचिन सेहवागला लाला का बोलतो याबद्दल तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेलच. म्हणूनच विरूने स्वतः याबाबतचा खुलासा केला आहे. 
एक व्हिडीओ पोस्ट करून सेहवाग म्हणाला, ''थॅक्यू गॉड जी, तुम्ही विचार करत असाल 'गॉड जी' मला लाला का बोलतात. पहिली गोष्ट म्हणजे मी 'लाला' (उत्तर भारतात लाला हा शब्द मुख्यतः व्यापा-यांसाठी किंवा वाणी समाजासाठी वापरला जातो)  सारखा दिसतो. ज्याप्रमाणे ते लठ्ठ असतात तसा मी दिसतो. दुसरं कारण म्हणजे मी क्रिकेटच्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो. म्हणजे, किती धावा झाल्या, किती चौकार, षटकार मारले. कोणी कुठे काय केलं. किती वेळेस सचिन तेंडुलकरसाठी मी धावलो. कदाचित म्हणूनच ते मला 'लाला' म्हणतात असं मला वाटतं. 'गॉड जी' ला काय वाटतं ते सचिन स्वतः सांगेल''. 
सेहवागने चेंडू सचिनकडे टोलावला आहे त्यामुळे आता सचिन 'लाला'बाबत काय खुलासा करतो ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ-
 

Web Title: VIDEO - Why does Tendulkar say 'Lala' Sehwag?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.