VIDEO: वेस्ट इंडिजचा 140 किलो वजनाचा 'वजनदार' क्रिकेटर

By Admin | Updated: March 1, 2017 12:07 IST2017-03-01T11:58:42+5:302017-03-01T12:07:39+5:30

वेस्ट इंडिजचा क्रिकेटर राहकीम कॉर्नवेल त्याच्या वजनामुळे चर्चेत आला असून त्याचं वजन तब्बल 140 किलो आहे

VIDEO: West Indian cricketer weighing 140 kg | VIDEO: वेस्ट इंडिजचा 140 किलो वजनाचा 'वजनदार' क्रिकेटर

VIDEO: वेस्ट इंडिजचा 140 किलो वजनाचा 'वजनदार' क्रिकेटर

ऑनलाईन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - क्रिकेटर म्हटलं की सर्वात महत्वाचा असतो तो फिटनेस. एक उत्तम खेळाडू बनण्यासाठी मैदानात चपळ असणं खेळाडूच्या दृष्टीने जास्त महत्वाचं असतं. मात्र वेस्ट इंडिजचा क्रिकेटर राहकीम कॉर्नवेल त्याच्या वजनामुळे चर्चेत आला असून त्याचं वजन आहे तब्बल 140 किलो. आता एवढं वजन असताना तो मैदानात खेळणार तरी कसा असा विचार जर तुम्ही करत असाल राहकीम कॉर्नवेल तुमची पार निराशा करतो. कारण वेस्ट इंडिजचा हा वजनदार खेळाडू मैदानातही वजनदार ठरत आहे. 
 
राहकीम कॉर्नवेल मुळचा अॅटिंग्वाचा असून त्याचं वजन 140 किलो आहे. राहकीम कॉर्नवेलची उंची 6.45 फूट आहे.
 
वेस्ट इंडिजने इंग्लडविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये राहकीम कॉर्नवेलला संधी दिली आणि त्याने त्याचं सोनं केलं. या सामन्यात इंग्लंडचा निसटता विजय झाला असला तरी राहकीमने केलेल्या 59 धावांची खेळी केली. नुसतीच फलंदाजी नाही तर गोलंदाजीतही राहकीमने आपली चमक दाखवली. त्याने 10 ओव्हरमध्ये 39 धावा देऊन एक विकेट घेतली. याआधी कॉर्नवेल ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉटिंगबरोबर कॅरेबिअन प्रिमिअर लीगमध्ये सहभाग घेतला होता. 
 
राहकीमने लीवॉर्ड आयलँडविरोधात खेळताना क्रिकेट जगताला आपली ओळख करुन दिली होती. या सामन्यात त्याने 74 धावा ठोकत संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता. राहकीम वजनामुळे चर्चेत आला असला तरी वेस्ट इंडिज क्रिकेट संघात प्रवेश मिळण्यासाठी हेच वजन अडथळा ठरण्याची शक्यता आहे.