VIDEO: ...म्हणून विराट, रोहित, रहाणेने इडन गार्डनवर मारला झाडू
By Admin | Updated: October 2, 2016 22:55 IST2016-10-02T22:55:23+5:302016-10-02T22:55:23+5:30
बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यासह टीम इंडियाने रविवारी ईडन गार्डनचा स्टँड झाडू घेऊन

VIDEO: ...म्हणून विराट, रोहित, रहाणेने इडन गार्डनवर मारला झाडू
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 2- बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यासह टीम इंडियाने रविवारी गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छ भारत’ मोहिमेंतर्गत ईडन गार्डनचा स्टँड झाडून स्वच्छता केली. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर व्हिडीओ पोस्ट केला असून ‘गांधी जयंतीच्या पर्वावर बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि विराट कोहली आणि टीम इंडियाने स्वच्छ भारत मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला.’अशी पोस्ट केली आहे.
यावेळी अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि अन्य खेळाडूही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये याच दिवशी ‘स्वच्छ भारत’ मोहिमेची सुरुवात केली होती.
On the occasion of #GandhiJayanti- BCCI President Lt. @ianuragthakur, @imVkohli & #TeamIndia take part in #SwachhBharatAbhiyan#MyCleanIndiapic.twitter.com/roerE9Q9g8
— BCCI (@BCCI) October 2, 2016