VIDEO: स्मिथला बॉल टाकल्यावर इशांतने दिली अशी रिएक्शन, विराटलाही आवरलं नाही हसू
By Admin | Updated: March 5, 2017 16:45 IST2017-03-05T16:45:34+5:302017-03-05T16:45:34+5:30
ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यान सुरू असलेल्या बंगळुरु कसोटीचा दुसरा दिवस इशांत शर्माच्या एक्सप्रेशनमुळे चर्चेत

VIDEO: स्मिथला बॉल टाकल्यावर इशांतने दिली अशी रिएक्शन, विराटलाही आवरलं नाही हसू
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 5- ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यान सुरू असलेल्या बंगळुरु कसोटीचा दुसरा दिवस इशांत शर्माच्या एक्सप्रेशनमुळे चर्चेत राहिला. 27 व्या षटकात इशांत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथला गोलंदाजी करत होता. प्रभावशाली षटक टाकूनही इशांतला या ओव्हरमध्ये विकेट मिळाली नाही मात्र, त्याने सर्वांचं मनोरंजन नक्कीच केलं.
या ओव्हरमध्ये इशांतने स्मिथला अनेकदा अडचणीत आणलं. त्यानंतर स्मिथची खिल्ली उडवत त्याने आगळे-वेगळे हावभाव दिले. ते पाहून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीलाही हसू आवरलं नाही. सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. याच ओव्हरमध्ये पुढच्या चेंडुवर इशांतला त्याच्या सारखेच हावभाव करत स्मिथने त्याला प्रत्युत्तर दिले.