VIDEO : जॉन सीनाने रिंगमध्येच गर्लफ्रेंडला केलं प्रपोज

By Admin | Updated: April 3, 2017 13:52 IST2017-04-03T12:39:30+5:302017-04-03T13:52:22+5:30

WWE सुपरस्टार जॉन सीनाने "रेसलमेनिया 33" दरम्यान रिंगमध्येच गर्लफ्रेण्ड निक्की बेलाला प्रपोज केलं.

VIDEO: John Shanney introduced girlfriend to ring in the ring | VIDEO : जॉन सीनाने रिंगमध्येच गर्लफ्रेंडला केलं प्रपोज

VIDEO : जॉन सीनाने रिंगमध्येच गर्लफ्रेंडला केलं प्रपोज

ऑनलाइन लोकमत

फ्लोरिडा, दि. 3 -  WWE सुपरस्टार जॉन सीनाने "रेसलमेनिया 33" दरम्यान रिंगमध्येच गर्लफ्रेंड निक्की बेलाला प्रपोज केलं. यावेळी बॉक्सिंगऐवजी रोमँटिक वातावरण निर्माण झालं होतं. शिवाय, अशा पद्धतीने निक्कीला प्रपोज करुन त्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.  सामना संपल्यानंतर जॉन सीनाने निक्कीला रिंगमध्ये प्रपोज करुन अंगठी घातली.
 
रविवारी जॉन सीना आणि निक्की बेलाचा सामना मिज आणि मरीस यांच्यासोबत होता. यावेळी जॉन आणि निक्कीने केवळ 5 मिनिटांत दोघांना हरवलं.  सामना संपल्यानंतर जॉन सीनाने रिंगमध्येच निकीला प्रपोज केलं. जॉन अशा पद्धतीने आपल्याला प्रपोज करणार आहे, याची कल्पनाही निक्कीने केली नव्हती.
 
जॉननं निक्कीच्या बोटात अंगठी घातल्यानंतर या भावनिक क्षणी निक्की आपले अश्रू आवरू शकली नाही.  विशेष म्हणजे यावेळी जॉनची आईदेखील तेथे उपस्थित होती. 
 
जॉन आणि निकी अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण आता लग्नबेडीत अडकणार आहेत. मात्र लग्नाची तारीख ठरवण्यात आलेली नाही.
 

Web Title: VIDEO: John Shanney introduced girlfriend to ring in the ring