VIDEO - भारताचा गोलंदाज प्रग्यान ओझा चेंडू डोक्याला लागून जखमी
By Admin | Updated: September 7, 2016 18:53 IST2016-09-07T18:48:18+5:302016-09-07T18:53:49+5:30
भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझा बुधवारी चेंडू डोक्याला लागून जखमी झाला.

VIDEO - भारताचा गोलंदाज प्रग्यान ओझा चेंडू डोक्याला लागून जखमी
ऑनलाइन लोकमत
नोएडा, दि. ७ - भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझा बुधवारी चेंडू डोक्याला लागून जखमी झाला. दुलीप करंडकाच्या सामन्या दरम्यान ही घटना घडली. फलंदाज पंकज सिंहने ऑफस्पिनर जालाज सक्सेनाच्या फ्लाईट चेंडूवर मारलेला फटका प्रग्यानच्या डोक्याला लागला.
चेंडूच्या आघाताने प्रग्यान मैदानातच कोसळला. त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले. मैदानाबाहेर नेताना प्रग्यान बेशुद्धावस्थेत होता. वैद्यकीय चाचण्यांसाठी प्रग्यानला रुग्णालयात नेण्यात आले.
त्यावेळी इंडिया ग्रीनचे प्रशिक्षक डब्लू. व्ही. रामन त्याच्यासोबत होते. रुग्णावाहिकेमध्ये ओझा बोलत होता व त्याची प्रकृती स्थिर आहे असे बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले.
Pragyan Ojha suffers freak head injury in @Paytm Duleep Trophy match, taken to hospital for testshttps://t.co/2HQPbG3zmF
— BCCI (@BCCI) September 7, 2016