VIDEO - तुम्ही धोनीचा डान्स बघितलाय ?

By Admin | Updated: April 10, 2017 17:09 IST2017-04-10T17:09:12+5:302017-04-10T17:09:12+5:30

रायजिंग पुणे सुपरजायंटस संघाकडून खेळणारा महेंद्रसिंह धोनी आणि संघ मालक हर्ष गोयंका यांच्यातील संबंध बिघडल्याची प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

VIDEO - Have you seen Dhoni's dance? | VIDEO - तुम्ही धोनीचा डान्स बघितलाय ?

VIDEO - तुम्ही धोनीचा डान्स बघितलाय ?

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 10 - रायजिंग पुणे सुपरजायंटस संघाकडून खेळणारा महेंद्रसिंह धोनी आणि संघ मालक हर्ष गोयंका यांच्यातील संबंध बिघडल्याची प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. पण धोनीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर धोनी पुणे संघामध्ये नाखूष आहे असे आपल्याला अजिबात वाटणार नाही. धोनी खेळाबरोबर मैदानाबाहेरही पुणे संघातील आपल्या सहका-यांसोबत मजा, मस्तीचा आनंद लुटत आहे. 
 
पुण्याची जर्सी परिधान केलेल्या धोनीने अलीकडेच आपल्या सहका-यांना डान्स कौशल्य दाखवले. धोनीने त्याचा हा डान्सिंग व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर इन्स्टाग्रामवर हिट झाला. 6 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि त्यावर 4 हजार कमेंट आल्या आहेत. 
 
पुणे संघाचे मालक हर्ष गोयंका यांनी त्यांच्या टि्वटसमधून धोनीला टार्गेट केल्याने वाद निर्माण झाला आहे. आयपीएलच्या 10 व्या मोसमाची पुण्यासाठी संमिश्र सुरुवात झाली. पुण्याने पहिल्या सामन्यात मुंबईवर विजय मिळवला. त्यावेळी गोयंकांनी मॅच विनिंग खेळी करणा-या स्मिथचं कौतूक केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी, "स्मिथने दाखवून दिलं कोण आहे जंगलचा राजा, आपल्या कामगिरीने त्याने धोनीला पूर्णतः झाकोळलं,  स्मिथची कर्णधारपदी निवड करण्याचा निर्णय योग्यच होता" असं ट्विट केलं होतं. 
 
दुस-या सामन्यात पंजाबविरूद्ध झालेल्या पराभवानंतर त्यांनी आपल्या संघातील खेळाडूंच्या स्ट्राइक रेटचा फोटो ट्विट केला. यामध्ये अप्रत्यक्षपणे संघात धोनीचा सर्वात खराब स्ट्राइक रेट असल्याचं त्यांनी म्हटलं. गोयंकाच्या या दोन्ही टि्वटसना धोनीच्या चाहत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. 

Web Title: VIDEO - Have you seen Dhoni's dance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.