VIDEO - रोईंगमध्ये दत्तू भोकनलचे आव्हान संपुष्टात
By Admin | Updated: August 9, 2016 18:12 IST2016-08-09T17:52:24+5:302016-08-09T18:12:48+5:30
-रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथ्या दिवसाची सुरुवातही भारतासाठी निराशाजनक झाली आहे.

VIDEO - रोईंगमध्ये दत्तू भोकनलचे आव्हान संपुष्टात
शिवाजी गोरे
रिओ दी जानेरो , दि. ९ -रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथ्या दिवसाची सुरुवातही भारतासाठी निराशाजनक झाली आहे. रोईंगमध्ये भारताचे एकमेव आशास्थान असलेले दत्तू भोकनल उपांत्यफेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला. रोईंगच्या सिंगल स्कल्स प्रकारात दत्तू भोकनल उपांत्यफेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला.
उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालेल्या दत्तूला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. रोईंगमध्ये दत्तू एकमेव भारताचे आशास्थान होते.
पहिल्या दिवशी पहिल्याच हिटमध्ये दत्तूने ७ मिनिटे २१.६७ सेकंद अशी वेळ नोंदवित तिसरे स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. टीम हिटमध्ये पहिल्या तीन स्थानांवर राहणा-या रोव्हर्सना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळते.