VIDEO: सामन्यादरम्यान रॉस टेलरने हासडली चक्क हिंदीत शिवी
By Admin | Updated: October 4, 2016 19:31 IST2016-10-04T19:31:15+5:302016-10-04T19:31:15+5:30
सध्या युट्यूबवर व्हायरल झालेला एक व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार रॉस टेलर वैतागून चक्क हिंदीत शिवी देताना

VIDEO: सामन्यादरम्यान रॉस टेलरने हासडली चक्क हिंदीत शिवी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - न्यूझीलंडविरुद्धच्या कोलकाता कसोटीत भारतीय संघाने 178 धावांनी दिमाखात विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. दोन्ही सामने गमावल्याने न्यूझीलंडचे खेळाडू मात्र कमालीचे निराश झाले आहेत. याचं एक उदाहरण म्हणजे सध्या युट्यूबवर व्हायरल झालेला एक व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार रॉस टेलर वैतागून चक्क हिंदीत शिवी देताना दिसत आहे.
दुस-या कसोटीच्या तिस-या दिवशीची ही घटना आहे. दुस-या डावात भारताचे पहिले दोन खेळाडू झटपट बाद झाल्याने कर्णधार विराट कोहली मैदानावर उतरला. त्यानंतर थोडयावेळात कोहलीविरोधात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी पायचीतचं अपील केलं. मात्र पंचांनी अपील फेटाळलं आणि किवींचा कर्णधार रॉस टेलर भलताच संतापला आणि वैतागलेल्या टेलरने भर मैदानातच शिवी हासडली. विशेष म्हणजे त्याने हिंदीत शिवी दिली. टेलरने हिंदीत शिवी दिल्याचं लक्षात येताच कोहली देखील आश्चर्याने टेलरकडे पाहून हसला.
पाहा व्हिडीओ-