VIDEO: फुटबॉल सामन्यादरम्यान टॅकल करताना डेम्बा बाचा मोडला पाय
By Admin | Updated: July 18, 2016 09:29 IST2016-07-18T09:29:49+5:302016-07-18T09:29:49+5:30
शांघाय एसआयपीजी आणि शांघाय शेनुआ संघांमधल्या सामन्यादरम्यान शांघाय शेनुआच्या सन शियांगनं डेम्बा बाला केलेल्या टॅकलमुळे त्याचा पाय मोडला आहे

VIDEO: फुटबॉल सामन्यादरम्यान टॅकल करताना डेम्बा बाचा मोडला पाय
>ऑनलाइन लोकमत -
बीजिंग, दि. 18 - चायनीज सुपर लीगमधील सामन्यादरम्यान डेम्बा बाला गंभीर दुखापत झाली आहे. शांघाय एसआयपीजी आणि शांघाय शेनुआ संघांमधल्या सामन्यादरम्यान ही दुखपात झाली आहे, सामन्यादरम्यान शांघाय शेनुआच्या सन शियांगनं डेम्बा बाला टॅकल केलं. या टॅकलमुळे डेम्बा बाचा पाय मोडला. त्यामुळे डेम्बा जमिनीवर कोसळला. दुखापतीनंतर डेम्बा बाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं.
फुटबॉल सामन्यादरम्यान दुखापती होत असतात. मात्र ही दुखापत इतकी गंभीर आहे की यामुळे डेम्बा बाची कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यका आहे. डेम्बा बानं आपल्या कारकीर्दीत चेल्सी, न्यूकास्टल युनायटेड, वेस्ट हॅम युनायटेड आणि बेसिकताससारख्या बलाढ्य संघांचं प्रतिनिधित्त्व केलं आहे.